`हे` बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय `या` कामातून करतात कोटींची कमाई
आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे side business ऐकून तुम्ही व्हाल थक्क...
Bollywood Actors Business: बॉलिवूड स्टार्स (Bollywood stars) अनेकदा कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. चित्रपटांसाठी कोट्यवधी रुपये फी घेणार्या कलाकारांना माहित आहे की ही वेळ नेहमीच सारखी नसते. कदाचित याच कारणामुळे शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार आणि माधुरी दीक्षित सारखे अनेक मोठे स्टार्स आपल्या चित्रपटातून करोडोंची कमाई करत आहेत. पण तुम्हाला माहितेय का काही असे बॉलिवूड स्टार्स आहेत जे बिझनेस (business) मधून चांगलेच कमावतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे side business ऐकून तुम्ही व्हाल थक्क... (These Bollywood stars earn crores from works without acting nz)
आणखी वाचा - अभिनेत्रीचा स्वॅगच वेगळा! इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेते इतके कोटी, तुम्हीही चक्रावून जाल
शाहरुख खान (Shah Rukh Khan)
बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खानची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर जगभरात आहे. गेल्या 4 वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेला शाहरुख खान लवकरच त्याच्या बॅक टू बॅक चित्रपटांसह परतणार आहे. अभिनेता असण्यासोबतच शाहरुख एक यशस्वी बिझनेसमन देखील आहे. तो मोशन पिक्चर प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटचा सह-अध्यक्ष आहे आणि आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सचा मालक देखील आहे.
सुनील शेट्टी (Sunil Shetty)
'धडकन', 'हेरा फेरी', 'फिर हेरा फेरी' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांनी जगभरात प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता सुनील शेट्टी आपल्या वेगवेगळ्या व्यवसायातून मोठी कमाई करत आहे. त्यांचे अनेक नाईट क्लब आणि रेस्टॉरंट आहेत. सुनील शेट्टीचे पॉपकॉर्न एंटरटेनमेंट नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.
अजय देवगण (Ajay Devgn)
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला कोण ओळखत नाही? नुकताच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दरम्यान, चाहतेही अजयच्या 'दृश्यम 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगणने गुजरातमधील चरणका सोलर पॉवरमध्ये गुंतवणूक केली आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हीएफएक्स स्टुडिओसह अजय देवगन फिल्म्स नावाच्या प्रोडक्शन हाऊसचाही तो मालक आहे.
आणखी वाचा - काजोलच्या आजीवर होते अशोक कुमार यांचं प्रेम!
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)
बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या अनेक दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. चित्रपटांमध्ये यशाची नवी शिखरे गाठणारी माधुरी आता टीव्ही आणि व्यवसायातून अतिरिक्त कमाई करत आहे. डान्स दिवाने 3 च्या जज माधुरी दीक्षित नेनेची 'डान्स विथ माधुरी' नावाची स्वतःची डान्सिंग अकादमी आहे.
अक्षय कुमार (Akshay Kumar)
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, आनंद एल राय यांच्या चित्रपटासाठी त्याने जवळपास 120 कोटी रुपये घेतले होते. त्याचवेळी, फोर्ब्सनुसार, अक्षय कुमारची एकूण संपत्ती 2050 कोटी आहे. अक्षय कुमारचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. ते हरी ओम एंटरटेनमेंट प्रॉडक्शन कंपनी आणि ग्रेझिंग गॉट पिक्चर्स प्रोडक्शनचे मालक आहेत.
सलमान खान (salman khan)
जर या यादीत सलमान खानचे नाव नसेल तर यादी कशी पूर्ण होईल. होय, 'दबंग' अभिनेता सलमान खानही चित्रपटांसोबतच त्याच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. तो स्वतः चित्रपटांची निर्मिती करतो. सलमानचा स्वतःचा व्यवसायही आहे. त्याचा बीइंग ह्युमन हा ब्रँड खूप प्रसिद्ध आहे.