Amruta Phadke Mother Second Marriage: आपल्या आयुष्यात एकटेपणाच्या टप्प्यावर कोणतरी पार्टनर असावा, आपलं आयुष्यचं बदलून जावं अशी इच्छेनं पुढे जाणं काहीच गैर नाही. ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईनं दुसरं लग्न केले. सोशल मीडियावर आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाच्या निमित्तानं तिला शुभेच्छा दिल्या होत्या. सिद्धार्थच्या आईनंतर आता अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनं आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहेत. 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीच्या आईनं दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. याबाबत तिनं आपल्याला इन्स्टाग्राम अकांऊटवरून खास पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपुर्वी 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. अमृता फडके हिनं या मालिकेत मानसी वहिनी म्हणजेच मानसी कानिटकर ही भुमिका केली होती. यावेळी अमृतानं सोशल मीडियावर आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाची बातमी दिली आहे. 


यावेळी तिनं पोस्टमध्ये लिहिलंय की, ''आई अभिनंदन. 8.12.2023, तुझ्या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुला उत्तम लाईफ पार्टनर मिळावा, अशी सगळ्यांचीच मनापासून इच्छा असते, पण तस वाटणं, तसं मिळणं व घडणं हे प्रत्येकाच्या नशिबी असतंच असं नाही; पण आई तुला ही संधी देवाच्या कृपेने पुन्हा मिळत आहे, तेही तुझ्या 2nd inningच्या टप्प्यावर!'' 


''खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं, अशी मनापासून इच्छा होती. माझ्या आयुष्यात हा शब्द आणि मनात ती जागा करणं सोप्प नव्हतं, पण बाबा तू खरंच ती जागा भरून काढू शकतोस, ही भावनाही माझ्यासाठी खूप सुखावणारी आहे. तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळाली आहे. मनाने खूप श्रीमंत असलेल्या, खूप मोठ्या कुटुंबाचा मी तुझ्यामुळे एक छोटासा भाग झाली आहे. खूप छान वाटतंय. मलाही खूप माणसांनी श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय, त्यासाठी तुझी आभारी आहे.''



''आई, या वयात आणि या टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिम्मत लागते. त्यासाठी खरंतर दोघांनाही सलाम. तुमची एकमेकांबरोबरची साथ-सोबत, तुमचा प्रेमाचा धागा अजून अजून पक्का होऊन घट्ट विणला जावो, हीच स्वामींचरणी प्रार्थना.'' अशी पोस्ट तिनं लिहिली आहे.