मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे काही दिवसांपूर्वी एले ब्युटी अवॉर्ड्स सोहळ्यात पोहोचली होती. तेव्हा तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस घातला होता. हा ड्रेस डिझाइनर प्रबल गुरूंगने डिझाइन केलं होतं. या ड्रेसवर अनन्याने मॅचिंग ब्लक शूज घातले होते. हे सर्व परिधान करून अनन्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर अभिनेता संजय कपूरने कमेंट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय कपूरने अनन्या पांडेच्या ड्रेसवर कमेंट केली आहे. या कमेंटमुळे संजय कपूरवर नेटीझन्सने टिकेची झोड केली आहे. संजय कपूर यांनी कमेंट केली आहे की, ड्रेस पडणार आहे. सावधान राहा... संजय कपूर यांच्या या कमेंटवर अनन्या पांडेच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे संजय कपूर देखील ट्रोल झाला आहे. 



एका युझर्सने म्हटलं आहे की, तुम्हाला लाज वाटायला हवी. तर दुसऱ्या युझरने म्हटलं होतं की, तुमच्या मुलीच्या व्हिडिओवर देखील अशी कमेंट लिहिणार का? अनन्या पांडे ही संजय कपूरची मुलगी शनाया कपूरची चांगली मैत्रिण आहे. दोघी अनेकदा एकमेकींसोबत पाहिलं आहे. यामुळे संजय कपूर यांची अनन्याच्या फोटोवरील ही कमेंट पटलेली नाही.



'स्टूडंट ऑफ द इअर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. अनन्या अनेकदा आपल्या चाहत्यांकरता फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचा आगामी सिनेमा कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर सोबत येत असून 'पती पत्नी आणि वो'चा रिमेक आहे.