मुंबई : सुपरस्टार शाहरुख खान अशा स्टार्सपैकी एक आहे ज्याचे अनेक कलाकार चाहते आहेत. या यादीत कार्तिक आर्यनच्या नावाचाही समावेश आहे. कार्तिक आर्यनने एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, शाहरुख हा पहिला अभिनेता आहे ज्याच्यासोबत त्याने सेल्फी घेतला होता. मात्र, कार्तिक आर्यन लोकप्रिय नसताना ही गोष्ट घडली. त्याने सांगितलं की, मन्नतसमोर त्याची एक झलक पाहण्यासाठी तो चाहत्याप्रमाणे शाहरुखच्या घरी पोहोचला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखसोबत सेल्फी
एका मुलाखती दरम्यान कार्तिक आर्यन म्हणाला, जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो तेव्हा एका चाहत्याप्रमाणे रविवारी मन्नतच्या बाहेर पोहोचलो. लोकांनी सांगितलं की, तो रविवारी चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर पडतो. तो गर्दीच्या मध्ये गाडीतून उतरत होता, त्यामुळे मला त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी मिळाली. मुलाखतीदरम्यान जेव्हा कार्तिक आर्यनला विचारण्यात आलं की, त्याने शाहरुखला याबद्दल कधी सांगितलं आहे का, तो म्हणाला, नाही, अजून सांगितलं नाही.



शाहरुखसोबत काम करण्याची बातमी
काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन शाहरुख खान निर्मित चित्रपटात काम करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नंतर हा प्रोजेक्ट रद्द करण्यात आला. बराच काळ लोटला तरी या प्रोजेक्टबाबत कोणतेही नवीन अपडेट आलेले नाही.