अभिनय सोडून अभिनेत्री बनली संन्यासी, दिसली रस्त्यावर भिक्षा मागताना, पाहा व्हिडिओ
व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की, भिक्षा मागण्याचा तिचा पहिला दिवस आहे.
मुंबई : तुम्ही अनेक अभिनेत्री पाहिल्या असतील, ज्या लग्नानंतर किंवा बाळा झाल्यानंतर अभिनयाचं जग सोडून देतात. मात्र, काही निवडक अभिनेत्रींनी इंडस्ट्री कायमची सोडली, कुटुंबासाठी नव्हे, तर निवृत्तीसाठी. टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार देखील त्यापैकीच एक आहे, जिने काही काळापूर्वी निवृत्ती घेतली होती. ती आता आपलं कुटुंब सोडून संन्यासी बनली आहे. या दरम्यान, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या कामांची झलक शेअर करत असते.
भिक्षा मागताना दिसली नूपुर अलंकार
नुपूर अलंकार ही संन्यासी झाली असल्याने ती कधी झोपडीत तर कधी कृष्णभक्तीत मग्न झालेली दिसते. आता अभिनेत्री भिक्षा मागताना दिसली. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती भिक्षा मागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की, भिक्षा मागण्याचा तिचा पहिला दिवस आहे. ती सांगत आहे की नवमीचा मुहूर्त आहे आणि तिला 11 लोकांकडे भीक मागावी लागत आहे. ती संन्यासीच्या पोशाखातही दिसत आहे.
संन्यासी होण्यापूर्वी पतीपासून विभक्त झाली होती
टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारला मूलबाळ नाही. रिपोर्ट्सनुसार, तिचं तिच्या पतीसोबतचे संबंधही अनेक वर्षांपासून ठीक नव्हते. त्यामुळे घटस्फोट न घेता दोघंही गेली ३ वर्षे विभक्त होते. दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया न्यायालयात सुरू आहे. मात्र अभिनेत्रीने तिच्या पतीपासून वेगळे होण्याचं खरं कारण अद्याप सांगितलेलं नाही. तिने निवृत्तीबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती खूप दिवसांपासून संन्यासी बनण्याचा विचार करत होती.
नुपूर अलंकारची मालिका
नुपूर अनेक वर्षे टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत होती. तिने 'घर की लक्ष्मी बेटियां', 'तंत्र', 'शक्तिमान' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे.