This Actress Used to Crack Dirty Jokes In Front Of Vinod Khanna : बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. 80 च्या दशकात त्यांची आणि मीनाक्षी शेषाद्रि यांची जोडी तर गाजलेली होती. विनोद खन्ना आणि मीनाक्षी शेषाद्रि यांनी ‘सत्यमेव जयते’, ‘जुर्म’, ‘पुलिस’, ‘मुजरिम’, ‘क्षत्रिय’ आणि ‘हमशक्ल’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. यातील त्यांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मीनाक्षी शेषाद्रि यांनी विनोद खन्ना यांना घेऊन काही मजेशीर किस्से सांगितले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Lehren Retro ला दिलेल्या मुलाखतीत मीनाक्षी शेषाद्रि यांनी विनोद खन्ना यांच्यासोबतच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'विनोद खन्ना आणि माझी खूप चांगली बॉन्डिंग होती. जेव्हा मी विनोद खन्ना यांच्यासोबत काम करत होती, तेव्हा माझ्या वडिलांना सेटवर येणं खूप आवडायचं. जेवणाच्या वेळी आम्ही डर्टी जोक्स शेअर करत होते. विनोद खन्ना यांचा स्वभाव शांत होता. ते त्यांच्या करिअरच्या टॉपवर होते. ते आश्रमात जायचे, मेडिटेशन करायचे आणि मग परत शूटवर यायचे', असं मीनाक्षी शेषाद्रि म्हणाल्या.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या आधी फिल्मफेयरला दिलेल्या मुलाखतीत मीनाक्षी यांनी विनोद खन्ना यांच्याविषयी सांगितलं की 'त्या काळात विनोद खन्ना हे ओशो रजनीश यांट्या टेप ऐकायचे. ते मला त्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी प्रोत्साहित करायचे. पण त्यांनी कधीच मला या गोष्टीसाठी फोर्स केलं नाही. त्यानंतर त्यांनी कविता दफ्तरी यांच्याशी लग्न केलं. मी त्यांच्या काही पार्ट्यांमध्ये देखील हजेरी लावली होती. हे माझ्यासाठी खूप कधी तरी घडणारं होतं. त्याचं कारण म्हणजे मला लोकांशी जास्त भेटणं किंवा त्यांना भेटणं आवडायचं नाही.'


मीनाक्षी शेषाद्रि यांनी 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या मनोज कुमार यांच्या ‘पेंटर बाबू’ मधून करिअरची सुरुवात केली. 1983 मध्ये त्यांचा दुसरा चित्रपट ‘हीरो’ हा प्रदर्शित झाला. त्यानंतर त्या लोकप्रिय झाल्या. त्याशिवाय त्यांनी 80 आणि 90 च्या दशकातील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. 


हेही वाचा : वडील मुस्लिम, आई हिंदू; मग कोणत्या धर्माचे पालन करते सारा अली खान?


सनी देओलसोबत मीनाक्षी शेषाद्री यांनी ‘घातक’ आणि ‘घायल’ सारखे चित्रपट केले होते. दरम्यान, 1996 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टी सोडत खासदी आयुष्याकडे लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्या अमेरिकेत शिफ्ट झाल्या. आता मीनाक्षी शेषाद्री यांनी परत चित्रपटसृष्टीकडे येण्याचा निर्णय घेतला आहे.