Bipasha Basu : बॉलिवूडमधील सिजलिंग आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये एका बंगाली अभिनेत्रींचं नाव आहे. ती अभिनेत्री म्हणजे बिपाशा बासू. बिपाशा बासून अनेक लक्षात राहिलेले चित्रपट केले आहेत. आज जानेवारी बिपाशा बासूचा 45 वा वाढदिवस आहे. बिपाशानं एक मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. पण तिच्या नशिबात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणं होतं. बिपाशानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर फक्त अभिनयावर काम केलं नाही तर लूक्सवर देखील काम केलं. तिच्या लूक्समुळे ती अनेकदा चर्चेत राहिली आहे. मात्र, सगळ्यात जास्त चर्चा ही तिच्या लव्ह लाइफची झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिपाशा बासूची लव्ह लाइफ ही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अनेकदा अडकली आहे. जेव्हा बिपाशा मॉडेलिंग करत होती तेव्हा बिपाशा बासूची ओळख लोकप्रिय मॉडेल मिलिंद सोमनशी झाली होती. तर त्यावेळी ते दोघं काही काळ रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटले जाते, पण दोघांचं नात जास्त काळ टिकलं नाही. त्यानंतर बिपाशा बासू ही डीनो मोरियासोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. त्या दोघांमधील जवळीक ही राज या चित्रपटा दरम्यान झाली. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच दोघांचा ब्रेकअप देखील झाला. 


जॉन अब्राहम ते राणा दग्गुबाती


बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमची लव्ह स्टोरी ही सगळ्यात चर्चेत होती. ते दोघं जवळपास 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्या काळात ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण बिपाशानं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तर तेव्हा जॉन लग्न करण्यासाठी तयार नव्हता. याच कारणामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम मारो दम या चित्रपटात बिपाशा दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीसोबत दिसली. या दरम्यान, ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. 


हेही वाचा : 'पुरुष एखाद्या स्त्रीला बूट चाटायला...', 'ॲनिमल' च्या यशावर जावेद अख्तरांचं परखड मत


करण सिंग ग्रोवरशी लग्न


राणा दग्गुबातीनंतर बिपाशाचं नाव हे सैफ अली खानसोबत देखील जोडण्यात आलं होतं. त्याशिवाय या यादीत अभिनेता हरमन बावेजाचे देखील नाव होते. मात्र, बिपाशाला खरं प्रेम हे करण सिंग ग्रोवरकडून मिळालं. ते दोघे रिलेशनशिपमध्ये देखील आले आणि त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये लग्न देखील केलं. करण हा बिपाशापेक्षा वयानं 4 वर्ष लहान आहे. बिपाशा आधी करण सिंग ग्रोवरची दोन लग्न झाली होती. तर 12 नोव्हेंबर 2022 मध्ये बिपाशानं मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव देवी असं आहे.