मुंबई : बॉलीवूड अभिनेता विकी कौशलला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. इंडस्ट्रीत त्यांनी स्वत:च्या बळावर स्वत:चं खास स्थान निर्माण केलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. दरम्यान, विक्की कौशलचा 13 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याला एका नजरेत ओळखणं कठीण होईल. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका नजरेत ओळखणं होईल कठिण
व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, विकी कौशल सुरुवातीपासूनच अभिनयाबाबत किती गंभीर होता. व्हिडिओमध्ये विकी कौशल खूपच बारीक दिसत आहे. 'ये है मोहब्बतें'मध्ये सिम्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिरीन मिर्झाही तिच्यासोबत दिसत आहे. दोघंही अभिनय शाळेत एकत्र शिकायचे. व्हिडिओमध्ये विकी आणि शिरीन खेळताना दिसत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ 
शिरीन मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. वास्तविक, शिरीनने नुकतंच इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सत्र सुरू केलयं. यादरम्यान एका यूजरने तिला विक्की कौशलसोबत तिचा व्हिडिओ शेअर करायला सांगितला. त्यानंतर तिने विक्कीची माफी मागणारा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला. शिरीन मिर्झाने कॅप्शनमध्ये लिहिलं, गुड ओल्ड एक्टिंग स्कूल डे 2009. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे.