Aditya Pancholi Birthday: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आदित्य पांचोली नेहमीच त्याच्या अभिनयापेक्षा वादांमुळे चर्चेत असतो. १२ सप्टेंबरला वाढदिवस साजरा करणाऱ्या आदित्यच्या आयुष्यात वाद आणि नातेसंबंधांच्या अनेक कहाण्या आहेत. चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलेल्या आदित्य पांचोलीचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच मनोरंजक आणि वादग्रस्त राहिले आहे.


जरीना वहाबसोबत विवाह आणि कौटुंबिक जीवन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य पांचोलीच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे लग्न. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या जरीना वहाबशी लग्न केले. त्यांचे वैवाहिक जीवन नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे कारण प्रत्येक अडचणीनंतरही आदित्य आणि जरीनाने एकमेकांची साथ सोडली नाही. त्यांना सूरज पांचोली आणि सना पांचोली अशी दोन मुले आहेत. सूरजनेही 'हीरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.


कंगना रनौतसोबत रिलेशनशिपमध्ये 


आदित्या पंचोलीचं नाव कंगना रनौतसोबत जोडलं गेलं. करिअरच्या सुरुवातीला कंगना आदित्य पंचोलीला आपलं मेंटर मानत असे. दोघांच्या नात्याची बातमी मीडियामध्ये खूप चर्चेत राहिली. पण हे नातं वादासोबत संपलं. कंगनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते दोघं पती पत्नीसारखे राहायचे. दोघांनी एकत्र घर घेण्याचं देखील प्लान केलं होतं. नंतर आदित्य पंचोलीने कंगनाने लावलेल्या आरोपांविरोधात कारवाई केली. 


फ्लाइटमध्ये वाद 


2011 मध्ये फ्लाइटमध्ये आदित्य पांचोलीचा क्रू मेंबर आणि को-पायलटसोबत वाद झाला होता. खराब हवामानाच्या घोषणेनंतर आदित्यने क्रू मेंबरला धक्काबुक्की केली, त्यानंतर वाद आणखी वाढला. त्याचप्रमाणे 2015 मध्ये आदित्य पांचोलीचेही मुंबईतील एका पबमध्ये भांडण झाले होते, जिथे त्याचे आवडते गाणे वाजले नाही म्हणून त्याने डीजेला मारहाण केली होती. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती.


वादातून बाहेर पडण्याचा प्रयत्न


आदित्य पांचोलीने आयुष्यात अनेकदा वादांना सामोरे जावे लागले, परंतु प्रत्येक वेळी तो कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने अडचणीतून बाहेर आला. मात्र, त्याचे वादग्रस्त आयुष्य नेहमीच चर्चेत असते, त्यामुळे त्याला चित्रपटांमध्ये करिअर सांभाळणे कठीण होते.