बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण आपण लहाणपणापासून ऐकतोय. बाळ लहाण असतं तेव्हाच कळतं की ते मोठं होऊन काय करणार आहे. हेच आपण अनेक कलाकारांच्या बाबतीत बोलतो अनेक कलाकार त्यांच्या करिअरची सुरुवात हे बालकलाकार म्हणून करतात पण तुम्हाला माहित आहे का की त्यातील काहीच कलाकार हे मोठ्यापणी देखील स्टार म्हणून ओळखले जातात. आज आपण अशाच एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत, त्या व्यक्तीनं आज 100 हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे ती व्यक्ती...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बाळाचं नाव पार्थसारंथी असे आहे. तर अशा नावाचा कोणाताही कलाकार नाही असं तुम्ही म्हणतं असाल. पण या बाळाला आज सगळेच कमल हासन या नावानं ओळखतात. पार्थसामंथी यांनी मोठं झाल्यानंतर त्यांचं नाव बदललं आणि कमल हासन या नावाने स्वत:ची ओळख निर्माण केली. कमल हासन यांनी वयाच्या पाचव्या का सहाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर काही चित्रपट केल्यानंतर कमल हासन यांनी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. त्यानंतर जवळपास सात वर्षांनंतर डान्स असिस्टंट म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. डान्समध्ये असिस्टंट म्हणून काम करण्यासोबत कमल हासन यांनी चित्रपट करण्यास सुरुवात केली. या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांना कधीच कोणतं क्रेडिट मिळालं नाही. 



कमल हासन यांनी शोले या चित्रपटात एक असिस्टंट म्हणून काम केलं होतं. कमल हासन यांनी सगळ्यात पहिली मुख्य अभिनेता म्हणून मिळालेली भूमिका ही मल्याळम चित्रपटात 1974 साली मिळाली होती. त्या चित्रपटाचं नाव कन्याकुमारी असं आहे. त्या चित्रपटासाठी त्यांना करिअरमधील पहिला फिल्मफेअर अवॉर्ड जिंकला होता. कमल हासन लवकरच 'कल्कि 2899 AD' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि त्यांचं मानधन हे चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, अशा देखील चर्चा आहेत की त्यांनी या चित्रपटासाठी 100 कोटी मानधन घेतले आहे. तर काही लोक म्हणतात की त्यांनी 40 रुपयांच्या मानधनाची मागणी केली होती. 


हेही वाचा : लग्नाच्या 18 वर्षानंतर 'हे' कपल घेणार घटस्फोट?


कमल हासन यांनी जेव्हा चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली तेव्हा त्यांना सगळ्यात आधी 500 रुपये मानधन म्हणून मिळाले होते. त्यानंतर कमल हासन हे थोडे मोठे झाले आणि त्यांनी चित्रपटांमध्ये सहायक भूमिका साकरण्यास सुरुवात केली. तर त्यांना 4 हजार रुपये मानधन म्हणून मिळू लागले. कमल हासन हे पहिले भारतीय कलाकार आहेत. ज्यांना एक कोटी रुपये मानधन म्हणून मिळाले होते. ही 1994 सालची गोष्ट आहे. तर 1988 ते 1998 मध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या भारतीय कलाकारांमध्ये कमल हासन होते.