मुंबई : 'तारक मेहता'मधील जुनी सोनू म्हणजेच अभिनेत्री निधी भानुशालीचा लूक आणि लाईफस्टाईल आता पूर्णपणे बदलली आहे. निधीने हिट सिटकॉममध्ये सोनू भिडेची भूमिका साकारली होती. काही वर्षांपूर्वी या मालिकेला निरोप घेतल्यानंतरही निधीचे सोशल मीडिया फॉलोअर्स खूपच मजबूत आहेत. निधीने आता वेबसर्फिंग करतानाचे असे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तुम्हीही तिचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निधीने इन्स्टाग्रामवर सर्फिंग करतानाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती मोनोकिनी परिधान करून बीचवर सर्फिंग बोर्डवर उभी असल्याचं दिसत आहे. तिच्यामागे एक मोठी लाट दिसत आहे आणि निधीच्या एक्सप्रेशनवरून दिसून येत आहे की, ती प्रत्येक लाटेशी लढण्यासाठी आणि स्वार होण्यास सज्ज आहे.  



बोर्डवर बसून दिल्या पोज
नुकतंच निधीने या बोर्डावरील तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती हसताना दिसत आहे. तर दुस-या फोटोत ती पोहताना दिसत आहे तर तिसर्‍या फोटोत ती अतिशय नाट्यमय पद्धतीने केस उडवताना दिसत आहे. अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.