`हा` प्रसिद्ध अभिनेता 10व्यांदा बनणार पिता; पत्नीसोबत गर्लफ्रेंडही प्रेग्नंट
स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्यासाठी २०२२ हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास वर्ष असणार आहे.
मुंबई : हे वर्ष चित्रपटांच्या बाबतीत भारतीय स्टार्ससाठी चांगलं ठरणार नाही. पण काही स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्यासाठी २०२२ हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास वर्ष असणार आहे. या वर्षी अनेक टीव्ही स्टार्स आणि बॉलीवूड स्टार्सच्या घरात पाळणा हलणार आहे.
नुकतंच सोनम कपूरने एका मुलाला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रियांका चोप्रा आई झाली. कॉमेडी क्वीन भारती सिंह आई झाली आहे आणि लवकरच आलिया भट्ट, बिपाशा बासू एक गोड बातमी देणार आहेत.
या सर्व आनंदाच्या बातम्यांमध्ये आता हॉलिवूडच्या जगातून एक अशी बातमी आली आहे. जी ऐकून तुम्ही काही सेकंद विचारात पडाल. कदाचित ही बातमी वाचून तुम्ही थोडा वेळ द्विधा मनस्थितीत रहाल, कारण बातमीच अशी आहे.
सुप्रसिद्ध अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट, अभिनेता, रॅपर आणि कॉमेडियन निक कॅनन पुन्हा वडील होणार असल्याची बातमी आहे. आता तुम्ही विचार करत असाल यात नवल ते काय? त्यामुळे आश्चर्याची गोष्ट म्हणजे निक कॅनन पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा नाही तर 10व्यांदा वडील होणार आहे.
होय, खुद्द निकने त्याच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. आता तुम्हाला हे वाचून आणखी आश्चर्य वाटेल की, निक 10व्यांदा वडिल होणार आहे. पण पत्नीपासून नाही तर त्याची एक्स गर्लफ्रेंड ब्रिटनी बेलच्या मुलाचा बाप होणार आहे. ते सुद्धा जेव्हा त्याची पत्नी देखील सध्या गरोदर आहे.
डेली मेलच्या बातमीनुसार, निकची पत्नी एबी डी ला रोजा लवकरच आई होणार आहे. त्याच्या मुलाच्या जन्मानंतर, निक 9व्यांदा पिता बनेल आणि त्यानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड एका मुलाला जन्म देईल आणि त्याच्यासोबत 10व्यांदा कॉमेडियन पिता बनेल. निक कॅननने त्याच्या इंस्टाग्रामवर ब्रिटनी बेलसोबत एक अतिशय रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ब्रिटनी तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.