मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर तिच्या क्लासी लाइफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. भलेही मीरा सिने इंडस्ट्रीमधून आली नसेल, पण शाहिद कपूरसोबत लग्नानंतर मीरा कपूर पूर्णपणे स्वत:मध्ये बदल घडवून आणताना दिसते. मीराने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच तिचे चाहते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असल्याचं दिसत आहे. असंच काहीसं मीरा कपूरच्या लेटेस्ट पोस्टमध्ये पाहायला मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीरा कपूरची लेटेस्ट पोस्ट
मीरा कपूरने पोस्टमध्ये शेअर केलेले फोटो पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतं की, ती तिचा दीर ईशान खट्टरसोबत गुड टाइम स्पेंड  करत होती आणि यादरम्यान दोघांनी एकमेकांचे बरेच फोटो क्लिक केले आहेत. मीराच्या या पोस्टमध्ये दोघंही यावेळी खूप मस्ती करताना दिसत आहेत.



मीरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. नुकतीच मीराने तिच्या नणंदेच्या लग्नातही खूप धमाल केली होती आणि त्यादरम्यान मीरा कपूरचा लूक खूप चर्चेत आला होता.