मुंबई : आजकाल सिंगर त्यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनय आणि डान्स देखील करताना दिसतात. असंच काहीसं पंजाबी सिंगर हार्डी संधूने देखील करायला सुरुवात केली आहे. आणि त्याच्या चाहत्यांना हे खूप आवडतंय. एकदा डान्स करत असताना हार्डी संधूची पॅन्ट खाली उतरली आणि समोर उभी असलेली पलक तिवारी हे पाहून थक्क झाली. गायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आहे चाहतावर्ग
पंजाबचा प्रसिद्ध सिंगर हार्डी संधूने केवळ लहान मुलांनाच नाही तर वयस्कर लोकांनाही आपलं वेड लावलं आहे. हार्डी संधूचं कोणतंही गाणं आलं की, त्याचे चाहते हे गाणं ऐकण्यासाठी उत्सुक असतात. मुलींमध्ये हार्डी संधूची वेगळीच क्रेझ आहे. हार्डी संधूचे कोणतंही गाणे आलं की, ते चर्चेत येतं.


हार्डी संधूची सगळी गाणी येताच ती हिट होतात.  नुकतंच त्याचं बिजली-बिजली गाणं रिलीज झालं ज्याने प्रत्येक व्यक्तीला वेड लावलं आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या गाण्यावर ताल धरला होता. इंस्टाग्रामवर सगळेजण या गाण्यावर रिल्स बनवून व्हिडिओ शेअर करत होते.


हार्डी संधूची उतरली पँन्ट
हार्डी संधू आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी 'बिजली बिजली' या गाण्यासाठी शूटिंग करत होती. शूटिंगदरम्यान संपूर्ण क्रू उपस्थित होते. हार्डी संधू आणि पलक तिवारी डान्सर्ससोबत शूटिंग करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शूटिंग सुरू असताना हार्डी संधूची पॅन्ट खाली उतरली. आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जेव्हा हार्डी संधूला याबद्दल कळलं की, मुलींसमोर त्याची पॅन्ट खाली उतरली आहे, तेव्हा त्याला काय करावं  सुचत न्हवतं.  आणि तो लाजू लागला. मात्र काहीवेळाने तो अशाच अवस्थेत नाचू लागला.  हा व्हिडीओ स्वतः हार्दिक संधूने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जो लोकांना खूप आवडला आहे. गंमत म्हणजे हार्डी संधूने या पँटखाली दुसरी पँट घातली होती, त्यामुळे तो वाचला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही