मुंबई : यंदाची फेमिना मिस इंडिया २०१८ चा ताज तामिळनाडूच्या अनुकृति वासला मिळाला. २९ स्पर्धकांना मागे टाकत अनुकृतिने प्रत्येकाचे मन जिंकले. मिस वर्ल्‍ड मानुषी छिल्लरने अनुकृतिला हा ताज घातला. सौंदर्याच्या बाबतीत या सर्वच मुली एकापेक्षा एक अगदी सरस होत्या. पण अनुकृतिच्या एका उत्तराने तिला मिस इंडियाचा मान मिळवून दिला. १९ वर्षांच्या अनुकृतिने अगदी प्रगल्भ विचारातून आलेल्या उत्तराने उपस्थितांचे मन जिंकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या उत्तरामुळे ती ठरली मिस इंडिया


कॉलेजमध्ये शिकत असलेल्या अनुकृतिला प्रश्नउत्तराच्या राऊंडमध्ये कोण उत्तम शिक्षक आहे? यश की अपयश? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अनुकृतिने उत्तर दिले की, मी असफलतेला उत्तम शिक्षक मानते. कारण आयुष्यात तुम्हाला नेहमी यश मिळत गेले तर तुम्ही त्यालाच अंतिम मानता आणि तुमची प्रगती थांबते. पण अपयश आल्यास तुम्हाला यश मिळवण्याची प्रेरणा मिळते आणि त्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करता.
यावेळी अनुकृतिने स्वतःचा अनुभवही शेअर केला. ती म्हणाली की, माझ्या आयुष्यातील अपयशच मला या मंचापर्यंत घेऊन आले आहे. एका ग्रामीण भागातून आल्याने अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. यावेळेस माझ्या आईशिवाय मला आधार देणारे दुसरे कोणीच नव्हते. मला असे वाटते की, मला मिळालेल्या अपयशामुळे, टिकांमुळे मी एक आत्मविश्वासी महीला म्हणून उभी राहू शकले. मी फक्त इतकेच बोलू इच्छिते की, अपयश तुम्हाला घाबरु शकते. पण तेच तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. पाहा अनुकृतिने दिलेल्या या उत्तराचा व्हिडिओ...



जज पॅनलमध्ये होते हे कलाकार


अनुकृति खेळाडू आणि डान्सर आहे. आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुकृति फ्रेंचमध्ये बीए करत आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कॉन्टेस्टमध्ये हरियाणात राहणारी मिनाक्षी चौधरी फर्स्ट रनर-अप ठरली तर आंध्रप्रदेशची श्रेया राव सेकेंड रनर-अप ठरली. दिल्लीतील गायत्री भारद्वाज, झारखंडची स्टेफी पटेल टॉप ५ मध्ये सहभागी झाली. स्पर्धेच्या जज पॅनलमध्ये बॉलिवू़ड अभिनेत्री मलायका अरोरा, अभिनेता बॉबी देओल, कुनाल कपूर, क्रिकेटर इरफान पठाण आणि के.एल. राहुल सहभागी झाले होते.