मुंबई : सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या बालपणीच्या फोटोंचा ट्रेंण्ड आहे. असाच एक अभिनेत्रीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक गोंडस मुलगी दिसत आहे. ज्यामध्ये ती चष्मा लावून स्माईल देताना दिसत आहे. ही मुलगी मोठी होऊन खूपच ग्लॅमरस स्टार बनली आहे. तिची स्माईलही खूप गोड आहे आणि ती तिच्या प्रत्येक कृतीने चाहत्यांचे मन जिंकते. नुकतीच ही मुलगी मिया बीबी अँड मर्डर या वेब सीरिजमध्ये दिसली होती. ज्याला खूप पसंती मिळाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर अनेक चित्रपटांमध्येही ती अनेक बड्या स्टार्सची हिरोईन राहिली आहे. जर तुम्ही आजपर्यंत या मुलीला ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सुप्रसिद्ध अभिनेत्री मंजरी फडणीसच्या बालपणीचा फोटो आहे. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त मंजरीने बंगाली, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही उत्तम काम केलं आहे. त्याचबरोबर तिने काही म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे.


मंजरी 'फाल्तू', 'जाने तू या जाने ना', 'ग्रँड मस्ती', 'वॉर्निंग', 'किस किस को प्यार करूं', 'वाह ताज', 'जीना इसी का नाम है', 'निर्दोष', 'बरोट हाउस' सारख्या चित्रपटात ती दिसली होती. 'जाने तू या जाने ना' मध्ये तिने जेनेलिया आणि इम्रान खानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटातील तिचं सौंदर्य आणि क्यूटनेस लोकांना खूप आवडला होता.


मध्य प्रदेशातील सागर येथील रहिवासी असलेल्या मंजरीचा जन्म 10 जुलै 1988 रोजी झाला. तिचे वडील भारतीय सैन्यात होते. तिने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. मंजरी फडणीस पहिल्यांदा चॅनल व्ही च्या शो 'पॉपस्टार इंडिया सीझन 2' मध्ये टेलिव्हिजनवर दिसली होती. शोचा दुसरा सीझनही 2003 मध्ये आला होता. मंजरी टॉप 8 स्पर्धकांमध्ये होती.



2004 मध्ये मंजरी फडणीस यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आणि ती 'रोक सको तो रोक लो' चित्रपटात 'सुहाना'च्या भूमिकेत दिसली. या चित्रपटाचं दिग्दर्शक अरिंदम चौधरी होते आणि सनी देओल, मंजरी, यश पंडित, अपर्णा कौर आणि राम मेनन मुख्य भूमिकेत होते. 2006 मध्ये मंजरीने बंगाली चित्रपटात पदार्पण केलं. त्याचवेळी 'अंजन दास'च्या 'फालतू' चित्रपटात ती 'तुकतुकी'च्या भूमिकेत दिसली होती.