Taapsee Pannu Childhood Photos:  सध्या अनेक सेलिब्रेटींचे लहाणपणीचे फोटो नेहमीच व्हायरल (Celebrity Childhood Photos) होत असतात. त्यांचे फोटो पाहून अनेक त्यांच्या चाहत्यांना आपलं बालपण आठवतं. आपल्या आवडत्या सेलिब्रेटींचे फोटो पाहायला त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोत तीन लहान क्यूट मुली दिसत आहे. या फोटोत दिसणारी मधली मुलगी आज बॉलिवूडमर अधिराज्य गाजवत आहे. फोटोत दिसणारी चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून तापसी पन्नू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना तापसीची प्रत्येक पोस्ट खूप आवडते आणि ती खूप लवकर व्हायरल होते. सध्या बॉलीवूड सेलिब्रिटी सतत त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यातच, अभिनेत्रीने तिच्या लहानपणीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे आणि त्यावर स्वतःच्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.


तापसीने लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे
तापसी पन्नूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या शालेय दिवसांतला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती शाळेच्या गणवेशात दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री खूपच क्यूट दिसत आहे. शाळेत झालेल्या क्रीडा स्पर्धेत ती पहिली आल्याचं तापसीच्या फोटोत दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल दिसत आहे. फोटोत ही अभिनेत्री तिच्या हातात बक्षीस घेवून पहिल्या क्रमांकाच्या बॉक्सवर उभी असल्याचं दिसत आहे. 


तापसीच्या फोटोवर कमेंट करत एका सोशल मीडिया यूजरने लिहिलं की, 'लहानपणीही तू खूप गोंडस दिसत होतीस'. तर अजून एका यूजरने लिहिलं आहे की, 'आजही तुम्ही खूप वेगाने धावत आहात मॅडम'. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तापसी पन्नू नुकताच OTT वर प्रदर्शित झालेल्या 'ब्लर' चित्रपटात दिसली आहे.



 या फोटोमध्ये अभिनेत्री दोन वेण्यांमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "ती खूप वेगाने धावते... लहानपणापासून". तापसीच्या या पोस्टवर स्टार्सपासून ते यूजर्सपर्यंत अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.