Ricky Martin Case: रिकी मार्टिन हा हॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक आहे. काही दिवसांपुर्वी रिकी मार्टिन याच्यावर त्याच्या 21 वर्षीय भाच्याने आरोप केले होते. या आरोपात त्याने असे सांगितले होते की रिकी मार्टिन हा त्याच्यासोबत sexual आणि romantic relationship मध्ये होता आणि या रिलेशनशिपमध्ये असूनही रिकी मार्टिनने त्याच्यावर अत्याचार केला आहे. रिकी मार्टिन याचे वय 50 एवढे असून त्याचा भाचा त्याच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिकीच्या भाच्याने Dennis Yadiel Sanchez केलेले आरोप अगदी कोर्टापर्यंत गेले आहेत. परंतु आपल्यावरील हे आरोप रिकी मार्टिनने फेटाळून लावले होते. त्यानंतर कोर्टाने 21 जूलैची तारिख ठेवली होती. या खटल्यात रिकीच्या भाच्याने आरोप मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही केस परवाच dismiss करण्यात आली आणि निकाल रिकी मार्टिनच्या बाजूने लागला. 


समोर आलेल्या माहितीनूसार ते दोघं सात महिने एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. रिकी मार्टिन हा गे असून 2014 साली त्याने Jwan Yosef शी लग्न केले आहे. Jwan Yosef हा स्वीडन चित्रकार आहे. रिकीच्या भाच्याने ते दोघं डेट करत होते असा खुलासा केला होता आणि त्यासोबत ते सेक्शूल रिलेशनशिपमध्ये असल्याचेही म्हटले होते. असे म्हटले जात आहे की रिकी मार्टिनचा भाचा Dennis Yadiel Sanchez हा रिकीच्या सावत्र बहिणीचा मुलगा आहे. 


केस जिंकल्यानंतर रिकी मार्टिन यांची प्रतिक्रिया ट्विटरवर समोर आली आहे. यात त्याने आपण निर्दोष असल्याचे सांगितले आहे. 



यापुर्वीही त्याच्यावर domestic violence ची केस होती. अद्याप त्याबद्दल फारसा खुलासा नाही. पण त्यानंतर रिकी मार्टिन याच्यावर त्याच्या भाच्याने लैंगिक संबंध ठेवल्याचे आरोप केले होते.