फरहान अख्तरची मोठी मुलगी Shakya आहे इतकी बोल्ड; पाहून व्हाल आश्चर्यचकित
जर तुम्ही स्टार किड असाल तर तुम्हाला लोकप्रिय होण्यासाठी सोशल मीडियावर एक्टिव्ह असावं लागेल. मग बघा तुमचं फॅन फॉलोइंग कसं वाढतं ते. स्टार किड असण्याचा हाच मोठा बेनिफीट आहे. परंतु फरहान अख्तरची मुलगी असूनही शाक्या अख्तरचे सोशल मीडियावर इतके फॉलोअर्स नाहीत. तरीही तिला याची पर्वा नाही. ती तिच्याच नादात जगते.
मुंबई : जर तुम्ही स्टार किड असाल तर तुम्हाला लोकप्रिय होण्यासाठी सोशल मीडियावर एक्टिव्ह असावं लागेल. मग बघा तुमचं फॅन फॉलोइंग कसं वाढतं ते. स्टार किड असण्याचा हाच मोठा बेनिफीट आहे. परंतु फरहान अख्तरची मुलगी असूनही शाक्या अख्तरचे सोशल मीडियावर इतके फॉलोअर्स नाहीत. तरीही तिला याची पर्वा नाही. ती तिच्याच नादात जगते.
ग्लॅमरपेक्षा फॅशनला जास्त महत्त्व देणारी शाक्य तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती 22 वर्षांची झाली आहे. यानिमित्ताने फरहाननेही सोशल मीडियावर एक गोंडस पोस्ट टाकून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाक्यचा एक जबरदस्त फोटो शेअर करत त्याने लिहिलं की, ''हॅपी बर्थडे ब्यूटीफुल गर्ल.'' पोस्टमध्ये त्याने शाक्यला टॅगही केलं.
फरहानची बहीण झोया अख्तरनेही शाक्यचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाक्य ही फरहानची माजी पत्नी अधुना भाबानीची मुलगी आहे. तिला आणखी एक बहीण अकिरा अख्तर आहे. ती 15 वर्षांची आहे. फरहान आणि अधुना यांचं २००० साली लग्न झालं. बराच काळ वैवाहिक जीवन जगल्यानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सध्या आयुष्यात पुढे जाताना फरहानने शिबानी दांडेकरसोबत दुसरं लग्नही केलं आहे.
बर्थडे गर्ल शाक्य अख्तरबद्दल बोलायचं झालं तर, जी स्वत:ला डिजिटल क्रिएटर म्हणते आणि लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करते. सोशल मीडियावर ती तिच्या वेगळ्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. फोटो पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की, शाक्य तिचे आजी-आजोबा जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खूप जवळची आहे.