मुंबई : कलाविश्वात एखाद्या सेलिब्रिटीला जितकं महत्त्वं दिलं जातं तितकंच तितकच त्या सेलिब्रिटीच्या वेगवेगळ्या लूक्सनाही महत्त्वं दिलं जातं. त्यातही सेलिब्रिटी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण असतील तर होणाऱ्या चर्चेविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या अभिनेता रणवीर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या लग्नसोहळ्याने अनेकांना भारावून सोडलं. त्यासोबतच आणखी एका गोष्टीवर चाहत्यांचं, संपूर्ण कला आणि फॅशन विश्वाच्याही नजरा खिळल्या. ती गोष्ट म्हणजे दीप-वीरचे लूक. 


लग्नसोहळ्यातील बऱ्याच समारंभांसाठी या जोडीने सेलिब्रिटी फॅशन डिझायन सब्यसाची मुखर्जी याच्या डिझाईन्सला पसंती दिली होती. या साऱ्या लूकमध्ये दीपिका आणि रणवीरने आनंद कारज अर्थात शीख विवाहपद्धतीच्या वेळी घातलेलला पेहराव सर्वांचीच मनं जिंकून गेला. 



भारतीय वस्त्रोद्योग, हातमाग, जरीकाम, नक्षीकाम, कोरीवकाम अशा पूर्वापार चालत आलेल्या कला आणि त्याला मिळालेली आधुनिकतेची, नव्या संकल्पनांची जोड या साऱ्याचा मेळ साधत सब्यसाचीने दीपिका आणि रणवीरच्या लग्नासाठीच्या कपड्यांचं डिझाईन केलं. 



इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याने याविषयीचे सुरेख असे व्हिडिओ पोस्ट करत वधू-वराच्या रुपात तयार करण्यासाठी नेमकी कशा प्रकारे मेहनत घेण्यात आली, याविषयीची माहिती अतिशय प्रभावीपणे सर्वांसमोर सादर केली.