मुंबई : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा सध्या नेटफ्लिक्सच्या 'आय एम नॉट डन यट' या शोमुळे चर्चेत आहे. या शोचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यात कपिल त्याच्या आयुष्यात न ऐकलेले किस्से सांगत होता. आता शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये त्याने पहिल्यांदा गिन्नी चतरथवर आपलं प्रेम कसं व्यक्त केलं ते सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी केली गिन्नीला प्रपोज करण्याची हिम्मत
व्हिडिओमध्ये कपिल शर्मा म्हणतोय की, "सगळ्या अभिनेत्रींमध्ये ती माझी आवडती होती कारण आम्ही एकत्र थिएटर करायचो. हे कर्तव्य मी अनेक गोष्टींमध्ये लावत आहे. ती मला फोन करून सांगायची की आज हे घडलं, ते घडलं. आज आम्ही खूप रिहर्सल केली. एक दिवशी तिने  मला फोन केला, त्यावेळी मी दारू प्यायलो होतो. 


कॉल रिसिव्ह करताना मी विचारलं, तुझं माझ्यावर प्रेम आहे का? ती थरथरत म्हणाली- काय? या माणसाला हिम्मत कशी झाली हे विचारयची? मात्र नंतर गिन्नीनं प्रपोजल स्वीकारून कपिलशी लग्नाचा निर्णय घेतला. कपिलच्या लग्नाची बातमी सर्वांसाठी एक धक्काच होती.  ना अफेअर ना काही चर्चा, थेट लग्नाच्या बंधनात अडकला कॉमेडी किंग. 


गिन्नीने सगळ्यांसमोर केली कपिलची मस्करी
कपिल पुढे मजेशीरपणे म्हणाला, मी देवाचे आभार मानले की, त्या दिवशी मी ताडी प्यायली नव्हती. मी ताडी प्यायली असती तर माझा प्रश्न बदलला असता, मी पुन्हा विचारलं असतं, गिन्नी, तुझ्या वडिलांना ड्रायव्हर हवा आहे का. या शोमध्ये कपिलची पत्नी गिन्नीही प्रेक्षकांमध्ये बसली होती. कपिल म्हणला, मला गिन्नीला एक गोष्ट सांगायची आहे. 


तुम्ही खूप चांगल्या घरातील आहात आणि आर्थिकदृष्ट्याही तुम्ही खूप चांगल्या घरातील आहात. स्कूटरवाल्या मुलाच्या प्रेमात पडताना काय वाटलं? याला उत्तर देताना गिन्नी म्हणाली, काही नाही, मला वाटलं की सगळ्यांना पैसेवाली माणसं आवडतात, मला वाटलं की या गरीबाचं भलं करावं. कपिल शर्माचा हा शो 28 जानेवारी 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज केला जाईल.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कपिलच्या आयुष्यावर बनणार सिनेमा
विशेष म्हणजे, कपिल शर्मावर बायोपिक बनवणार आहे. ज्याची घोषणा तरण आदर्श यांनी केली होती. मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित 'फुंकार' असं या चित्रपटाचं नाव आहे. याआधी त्याने सुपरहिट फ्रँचायझी फुक्रेचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात कपिलचा संघर्ष ते कॉमेडीचा बादशाह बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.