मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ( Salman Khan birthday) आज (27 डिसेंबर) वाढदिवस आहे. सलमान 56 वर्षांचा झाला आहे. सलमानला पाहून तो 56 वर्षांचा आहे, हे पटणार नाही. सलमानचा फिटनेस हा तरुणांना लाजवणारा आहे. भाईजान फिटनेसबाबतीत आजही नव्या दमाच्या अभिनेत्यांवर वरचढ ठरतोय. सलमान फिट राहण्यासाठी दररोज वर्कआऊट करतो. तसेच आपल्या डाएट प्लॅनचा विशेष काळजीही घेतो. (This is the fitness secret of Actor Salman Khan celebrating 56th birthday know his diet plan)
     
हार्ड वर्क हे माझ्या परफेक्ट बॉडी आणि फिटनेसचं रहस्य आहे, असं सलमानने एकदा म्हंटलं होतं. स्वंयशिस्त आणि तुमच्यातील एखाद काम करण्याची जिद्द तुम्हाला अपेक्षित सुडौल आकार आणि अपेक्षित शरीरयष्ठी मिळू शकते, असं सलमानला वाटतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान नेहमीच सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करतो.   


मीडिया रिपोर्टनुसार, सलमान दररोजच्या वर्कआऊटबाबत फार सजग असतो. शूटिंगचा अपवाद वगळता सलमान केव्हाच वर्कआऊट करणं टाळत नाही. हेच त्याचं फिटनेस सीक्रेट आहे. सलमान दररोज 2-3 तास घाम गाळतो, असं सलमानचा पर्सनल फिटनेस ट्रेनर राकेश उडियार म्हणाला.


आठवड्यातील 6 दिवस वर्कआऊट 


सलमान आठवड्यात 6 दिवस वर्कआऊट करतो. तर रविवारी विश्रांती करतो. सलमान आठवड्यातील 3 दिवस लिफ्टिंग तर उर्वरित 3 दिवस कार्डियो करतो. सलमान कार्डिओच्या सुरुवातीआधी 15-20 मिनिटं ट्रेडमिलवर धावतो. यानंतर सलमान जंपिग, पुलअप्स आणि पुशअप्स यासारखा वार्मअप करतो.   


सलमानचा असा आहे डाएट प्लान 


मीडिया रिपोर्टनुसार, सलमान त्याच्या डाएटबाबत फार सतर्क असतो. सलमान अंडी, मासे, दूध, हिरव्या भाज्या खातो. 


सकाळचा नाश्ता - लो फॅट दुधासह 4 अंडी (सफेद भाग)
वर्कआऊट आधी - 2 अंड्यांमधील सफेद भाग, एसिड टॅबलेट आणि प्रोटीन शेक
वर्कआऊटनंतर - बादाम, ओट्स, 3 अंडी (सफेद भाग) आणि प्रोटीन 
दुपारचं जेवण - सलाद, भाजी आणि 5 चपात्या. 
संध्याकाळ - प्रोटीन बार, बादाम आणि इतर सुका मेवा 
रात्रीचं जेवण - वेगन सूप, मासे किंवा चिकन, 2 अंडी