मुंबई : विविध संकल्पनांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांच्या निमित्ताने अनेकदा काही आव्हानात्मक  परिस्थितीचताही कलाकारांना सामना करावा लागतो. मुख्य म्हणजे यामध्ये त्यांच्या सहनशीलतेची आणि प्रयत्नांची पराकाष्ठाही लागते. एखादी कलाकृती प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कलाकार मंडळी अगदी बऱ्याच सीमा ओलांडतात. ज्याचा प्रत्यय 'जबरिया जोडी' या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हंसी तो फंसी' या चित्रपटातून झळकलेली जोडी, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा जवळपास चार वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


'जबरिया जोडी' असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. बिहरच्या 'पकडवा शादी' या संकल्पनेवर आधारित कथानक या चित्रपटातून साकारलं जात असून  लखनऊमध्ये त्याचं चित्रीकरण सुरु आहे. 


याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान परिणीतीला एक महत्त्वाचं पाऊल उचलावं लागलं. 


चित्रपटात बरीच विवाहदृश्य साकरली जाणारा असून, त्यातील एका दृश्याचं चित्रीकरण हे खऱ्याखुऱ्या गाई- म्हैशींच्या गोठ्यात करण्यात आल आहे. ज्यासाठी अभिनेत्री परिणीती चोप्राने त्या गोठ्यात चक्क १३ तासांहून अधिक काळ व्यतीत केला. 


सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार,  हे दृश्य अधिक प्रभावीपणे साकारण्यासाठी निर्माते- दिग्दर्सकांनी गोठ्याशेजारीत चित्रीकरणाची व्यवस्था केली. 


मुख्य म्हणजे काही कामासाठी गोठ्याच्या आत- बाहेर कोणी ये-जा केली तर त्यामुळे सेटला नुकसान पोहोचण्याची शक्यता होती. ज्यामुळे शेवटी सिद्धर्थ आणि परिणीतीने सेटवर म्हणजेच त्या गोठ्यातच राहण्याचा निर्णय घेतला होता. 


चित्रीकरणासाठी इतका आटापिटा केल्यानंतर आता परिणीती आणि सिद्धार्थची ही 'जबरिया जोडी' येत्या कालात प्रेक्षकांची पसंती मिळवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.