VIDEO : श्रीदेवी यांचा अखेरचा व्हिडिओ तुमच्या डोळ्यांत अश्रू उभे करू शकतो
बॉलिवूडच्या `चांदणी`नं सगळ्यांनाच `सदमा` देत या जगाचा अचाक निरोप घेतलाय.
मुंबई : बॉलिवूडच्या 'चांदणी'नं सगळ्यांनाच 'सदमा' देत या जगाचा अचाक निरोप घेतलाय.
बॉलिवूडची 'पहिली सुपरस्टार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ५४ वर्षांच्या होत्या.
आपल्या भाच्याच्या लग्नासाठी त्या दुबईत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांची छोटी मुलगी खुशी आणि पती बोनी कपूर हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होती. मोठी मुलगी जान्हवी मात्र शुटिंगच्या कारणामुळे मुंबईतच होती.
याच लग्नातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ श्रीदेवी यांचा अखेरचा व्हिडिओ ठरलाय.
मुंबईत आणणार पार्थिव
श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव मुंबईला आणण्यात येणार आहे.
श्रीदेवी यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसलाय. अमिताभ बच्चन ते अनुष्का शर्मा सगळ्यांनीच सोशल मीडियावरून श्रीदेवी यांना आदरांजली वाहिलीय.
बालवयापासूनच अभिनयाला सुरूवात
श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचा दीर संजय कपूर यांनी दुजोरा असून त्या आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी अभिनयाची सुरुवात लहान असतानाच सुरु केली होती. १९७८ साली सोलहवाँ सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे.
उत्कृष्ट अभिनयासोबत अनेक पुरस्कार
बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गावाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना २०१३ साली भारत सरकारकडून 'पद्मश्री' या पुरस्काराने गौरविण्यात आले होतं. याशिवाय त्यांना आतापर्यंत पाच फिल्मफेयर पुरस्कारही मिळालेत..