मुंबई : बॉलिवूड स्टार्स कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्याचबरोबर, चाहते देखील त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल सगळंकाही जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता असतात. भलेही तो लहानपणीचा फोटो असो किंवा त्याच्या आवडत्या स्टारचा थ्रोबॅक फोटो. सोशल मीडियावर येताच त्यांचे फोटो व्हायरल होवू लागतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्‍ही तुम्‍हाला या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो दाखवणार आहोत, जो पाहिल्‍यानंतरही तुम्‍ही तिला ओळखूच शकणार नाही. हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की, ही चिमुकली  कोण आहे. चला तर मग आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून  फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडीसाऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आहे.


अभिनेत्री सामंथाचा बालपणीचा फोटो
हा फोटो अभिनेत्री सामंथाचा बालपणीचा फोटो आहे. ज्यामध्ये अभिनेत्री खूपच क्यूट दिसत आहे. समंथा या आधी नागा चैतन्यासोबत घटस्फोटाबाबत सतत चर्चेत होती. यानंतर, अभिनेत्रीने चित्रपटातील तिच्या आयटम साँग ओ अंतवा गाण्यासाठी बरीच चर्चेत होती.  दक्षिणेतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामंथा रुथ प्रभूचं नाव सामील आहे. कामाच्या आघाडीवर, समंथा लवकरच 'यशोदा' चित्रपटात दिसणार आहे.