मुंबई : सिनेसृष्टीतील मानाचा मानला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे फिल्मफेअर. नुकताच फिल्मफेअर मोठ्या उत्साहात पार पडला. फिल्मफेअर मराठी २०२४ या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन यावर्षी सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ या दोन अभिनेत्यांनी केलं. याचबरोबर प्राजक्ता माळी, वैभव तत्त्ववादी या कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यात लाइव्ह परफॉर्मन्स केले. तर हिंदी सिनेसृष्टीतील नवाजुद्दीन सिद्दिकी आणि तेजस्वी प्रकाश यांनी देखील फिल्मफेअर मराठीला उपस्थिती लावली होती. नजर टाकूया फिल्मफेअर मराठीच्या विजेत्यांच्या यादीवर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल्मफेअर मराठी २०२४ : पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी


१. सर्वोत्कृष्ट चित्रपट : आत्मपॅम्फ्लेट, बाईपण भारी देवा
२. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आशिष बेंडे ( आत्मपॅम्फ्लेट )
३. सर्वोत्कृष्ट चित्रपट  ( Critics ) : बापल्योक, नाळ २
४. सर्वोत्कृष्ट अभिनेता : शशांक शेंडे (बापल्योक )
५. सर्वोत्कृष्ट अभिनेता ( Critics ) : अंकुश चौधरी ( महाराष्ट्र शाहीर )
६. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी देशपांडे ( श्यामची आई )
७. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( Critics ): रोहिणी हट्टंगडी ( बाईपण भारी देवा )
८. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : जितेंद्र जोशी ( नाळ २), विठ्ठल काळे ( बापल्योक )
९. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : अनिता दाते ( वाळवी ), निर्मिती सावंत ( झिम्मा २)
१०. सर्वोत्कृष्ट गीत : गुरु ठाकूर- (उनाड )
११. सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम : महाराष्ट्र शाहीर – अजय-अतुल
१२. सर्वोत्कृष्ट गायक : जयेश खरे, मयुर सुकाळे (महाराष्ट्र शाहीर )
१३. सर्वोत्कृष्ट गायिका : नंदिनी श्रीकर ( उनाड)
१४. सर्वोत्कृष्ट कथा : आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)
१५. सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले : मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी ( वाळवी )
१६. सर्वोत्कृष्ट संवाद : परेश मोकाशी ( आत्मपॅम्फ्लेट )
१७. सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन : अनमोल भावे ( घर बंदुक बिर्याणी )
१८. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : LAWRENCE DCUNHA ( उनाड )
१९. सर्वोत्कृष्ट एडिटिंग : फैसल महाडिक, इम्रान महाडिक ( आत्मपॅम्फ्लेट )
२०. सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष : आशितोष गायकवाड ( उनाड)
२१. सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री : प्रियदर्शिनी इंदलकर ( फुलराणी )
२२. सर्वोत्कृष्ट बालकलाकार : त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे ( नाळ २ )
२३. जीवनगौरव पुरस्कार : सुहास जोशी 


सगळ्या विजेत्या कलाकारांवर सध्या मनोरंजन विश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.