मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) उत्तम अभिनय करते पण राजकारणात ती जास्त लक्ष देत नाही. असं असताना देखील दीपिकाने एक इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते  राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावं असं दीपिकाला वाटतं. तर दीपिकाची ही इच्छा पूर्ण होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका मुलाखतीत दीपिकाने राजकारणाबद्दल स्वतःचं मत मांडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका म्हणाली, 'मला राजकारणाबद्दल अधिक माहिती नाही. पण मी टीव्हीवर पाहाते आणि राहुल गांधी आपल्या देशासाठी जे कार्य करत आहेत, ते अतिशय उल्लेखनीय आहे. आताच्या तरूणांसाठी ते परिपूर्ण उदाहरणे आहेत. मला आशा आहे की ते स्वत: एक दिवस पंतप्रधान होतील. ' असं दीपिका म्हणाली. 


पुढे दीपिका म्हणाली, 'राहुल गांधी आणि तरूणांचे विचार जवळपास सारखे आहेत. राहुल गांधी यांचे विचार ट्रेडिशनल पण त्यामध्ये भविष्याचा दृष्टीकोन असतो.' एका मुलाखतीत दीपिकाने तिची इच्छा व्यक्त केली. 


दीपिकाच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर ती अभिनेता रणवीर सिंगसोबत '83' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्याच्या भेटीस येणार आहे. शिवाय 'द इंटर्न',  'पठान' आणि शकुन बत्रा यांच्या चित्रपटात काम करताना देखील दिसणार आहेत.