मुंबई : अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये आधिराज्य गाजवणारा अभिनेता शाहरूख खानला किंग खान म्हणून देखील ओळखळं जातं. आपल्या जिद्दीच्या जोरावर बॉलिमध्ये वर्चस्व प्रस्थापित करणारा शाहरूख आज यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहे. त्याचे चाहते फक्त भारत देशातच नाही तर अखंड जगात आहेत, तर काहींच्या प्रेरणास्थानी शाहरूख आहे. त्याचप्रमाणे त्याच्या हटके स्टाईलला फॉलो करणारे देखील फार आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हुबेहूब त्याच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हुबेहूब शाहरूख सारखा दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव सोशल मीडियावर अकरम असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि तो एक छायाचित्रकार आहे. सोशल मीडियावर त्याच्या लूकची फार चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे अनेक जण त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी देखील उत्सुक असतात.



'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अकरमने अनेक स्थनिक वृत्तवाहिन्यांना मुलाखती देखील दिल्या आहेत. त्याला एका गोष्टीचा फार आनंद आहे की तो किंग खान शाहरूख खान सारखा दिसतो.