मुंबई : ‘हेट स्टोरी’ या सीरीजमधील चौथ्या सिनेमाच शुटिंग लवकरच सुरू होणार आहे. या सीरीजचे चाहतेही ‘हेट स्टोरी ४’ सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. यासोबतच या सिनेमात यावेळी कोणती अभिनेत्री अदाकारी करणार, याचीही प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्या अभिनेत्रीबद्दल आता खुलासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबी सिनेमांमधील यशस्वी इनिंगनंतर अभिनेत्री इहाना ढिल्लो ही ‘हेट स्टोरी ४’ मध्ये बघायला मिळणार आहे. या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाबद्दल इहाना म्हणाली की, ‘मी ‘हेट स्टोरी ४’चा भाग आहे. मला सर्वातआधी प्रॉडक्शन हाऊसने फोन केला. आधी मला जरा संशय आला. त्यामुळे मी सिनेमासाठी नाही म्हणाले. कारण मला बोल्ड भूमिकेतून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घ्यायची नव्हती. मात्र, त्यानंतर टीमसोबत भेट झाल्यावर मी कथा ऎकली’. 


ती म्हणाली की, ‘सिनेमाची कथा ऎकल्यावर आणि माझ्या भूमिकेबद्दल जाणून घेतल्यावर मी लगेच होकार दिला’. या सिनेमाचं शुटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. इहाना ही पंजाबी सिनेमांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. इतकेच नाही तर ती सोशल मीडियातही आपल्या झकास फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. चला बघुया तिचे काही खास फोटोज...








इहानाने सांगितले की, ‘या सिनेमात तिच्या लूकपेक्षा तिच्या अभिनयाला जास्त महत्व देण्यात आलं आहे. त्यामुळे ती खरंच या सिनेमाबद्दल खूप उत्सुक आहे.