Shah Rukh Khan's Actress Family Was Saved by Hindus : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत डंकी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली तापसी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तापसी पन्नूनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून करिअरला सुरुवात केली त्यानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी तिनं खूप स्ट्रगल केलं. पण तुम्हाला माहितीये कधी काळी तापसीचं कुटुंब हिंदूंमुळे वाचलं, नाही तर काय झालं असतं त्याविषयी तापसीनं एका मुलाखतीत खुलासा केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तापसीनं काही दिवसांपूर्वी द लल्लनटॉपला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तापसीनं सांगितलं की 1984 मध्ये दिल्लीच्या शक्ति नगरमध्ये त्यांचं एकट्याचं शीख कुटुंब होतं. जर ते नसते तर काय झालं असतं तर काय होतं याविषयी सांगितलं आहे. तापसीनं सांगितलं की दंगली झाल्या असल्या तरी त्यांना कधी वाटलं नाही की त्यांच्या कुटुंबानं काही वाईट सोसलं आहे. त्यानंतर तिनं दावा केला की जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा तिला या गोष्टीची जाणीव झाली की ती अल्पसंख्याक धर्मातून आहे.



दंगलींच्या आठवणींविषयी विचारता तापसी म्हणाली, त्यावेळी माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं नव्हतं. माझी आई पूर्व दिल्लीत राहत होती. माझे वडील शक्ती नगरमध्ये राहत होते. त्यावेळी जे काय झालं होतं त्याविषयी मला जे काही माहित आहे. ते सगळं मी माझ्या आई-वडिलांकडून ऐकलं आहे. माझ्या आईनं मला सांगितलं की शहराच्या ज्या भागात ती होती तिथे ती सुरक्षित होती. पण शक्ति नगरमध्ये आमचं एकटं शीख कुटुंब होतं. त्यावेळी आमच्या घराच्या बाहेर एक जोंगा होती. जास्त लोकांकडे ही गाडी नव्हती. भारतीय सेना निसान द्वारा डिझाइन करण्यात आलेली ही जोंगा वापरायची. जबलपुर आयुध आणि गनकॅरिज असेंबलीला जोंगा नावानं ओलखायचे.


हेही वाचा : हाच का तुमचा खरा चेहरा! चिरंजीवी यांनी सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला मारला धक्का! VIDEO पाहून नेटकरी संतप्त


पुढे तापसीनं सांगितलं की कशा प्रकारे तिच्या वडिलांच्या घरासमोर उभी असलेल्या जोंगा गाडीमुळे दंगल करणाऱ्या लोकांना हे शीख कुटुंबाचं घर आहे याची ओळख करण्यास मदत केली. 'जेव्हा लोकं तलवार आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन येत होते, तेव्हा त्यांनी जोंगा पाहिली. त्यांना माहित होतं की आमचं कुटुंब हे त्या परिसरात एकमेवर शीख कुटुंब होतं. पळून जाण्याचा प्रयत्न करणं काही फायद्याचं ठरलं नसतं, कारण आमच्या कुटुंबाला माहित होतं की त्यांच्या आजूबाजुला हे लोक आहेत. त्यामुळे त्यांनी घरातील सगळ्या लाईट्स बंद केल्या आणि लपले. ज्या घरात आम्ही राहत होतो त्यात चार भाडेकरू राहत होते. ते सगळे हिंदू होते. जेव्हा दंगली करणारे आले, तेव्हा त्यांनी आमची रक्षा केली. जेव्हा त्यांनी गाडी पाहिली आणि तेव्हा ते आमच्या घराच्या दरवाज्यावर आले. तेव्हा शेजारच्यांनी सांगितलं की ते शहर सोडून गेले आहेत. आग लावल्यानं गाडी तर गेली. पण आम्ही वाचलो कारण आमचे शेजारी आमच्या शेजाऱ्यांनी आमची रक्षा केली.'