`बॉलिवूडला मी परवडत नाही` म्हणणाऱ्या `या` दाक्षिणात्य बालकलाकाराला तुम्ही ओळखलं
South Indian child artist : दाक्षिणेतील या बालकलाकारला तुम्ही ओळखलत का? कधी बॉलिवूडमध्ये काम करण्यावरून केलं होतं मोठं वक्तव्य
South Indian child artist : बॉलिवूड कलाकारांसोबत स्टारकिड्स देखील तितकेच चर्चेत असतात. त्यात फक्त बॉलिवूड कलाकारांची मुलं नाही तर त्यांच्यासोबतच दाक्षिणात्य कलाकार आणि त्यांची मुलं देखील आजकाल वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. दरम्यान, असे देखील काही स्टार किड्स आहेत ज्यांनी बालपणीच मोठ्या पडद्यावर काम केले. असाच एक कलाकार आहे ज्यांन बालकलाकार म्हणून चित्रपटात काम केलं. मात्र, चित्रपटाची निर्मिती करणारे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की मोठ्या पडद्यापासून लांब रहा. त्यामुळे तो नऊ वर्षे मोठ्या पडद्यापासून लांब राहिला. आज हाच बालकलाकार मोठा सुपर स्टार झाला आहे. इतकंच नाही तर तो त्याच्या वागणूकिसाठी ओळखला जातो. मात्र, एकीकडे जिथे दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. तिथे या कलाकारानं बॉलिवूड त्याला अफोर्ड करू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं.
आता हा बालकलाकार कोण होता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं नाव महेश बाबू आहे. महेश बाबूनं वयाच्या चौथ्या वर्षी त्याच्या करिअरला सुरुवात केली. त्यानं चाइल्ड आर्टिस्ट म्हणून चित्रपटात काम केलं आहे. मुलाला चित्रपटसृष्टीविषयी असणारं आकर्षण पाहून निर्माता आणि दिग्दर्शक असलेले त्याचे वडील शिवा राम कृष्णा यांनी त्याला चित्रपटसृष्टीपासून लांब राहण्यास सांगितले. त्यानंतर त्यानं तो जवळपास नऊ वर्षे मोठ्या पडद्यापासून लांब राहिला. दरम्यान, असं म्हटलं जातं की महेश बाबू हा प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंग आधी त्याचे डायलॉग हे पाठ करतो. जेणेकरून सीन शूट करताना काही चूक व्हायला नको.
हेही वाचा : 'श्रीमान-श्रीमती' फेम राकेश बेदी यांच्यासोबत ऑनलाइन फसवणूक, कथित आर्मी ऑफिसरकडून गंडा
महेश बाबू हा दाक्षिणेतील लोकप्रिय कलाकार आहे. तर तो एका चित्रपटासाठी 60 ते 80 कोटी मानधम घेतो असे म्हटले जाते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांची क्रेझ ही कोणत्याही बॉलिवूड कलाकारापेक्षा कमी नाही. आता तर बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करताना दिसतात. इतकंच नाही तर हिंदीत डब झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटांना देखील चांगली पसंती मिळते. या दरम्यान, महेश बाबूला बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा नाही. तो जिथे आहे तिथे आनंदी आहे असं त्याचे म्हणणे आहे. इतकंच नाही तर त्यानं एका मुलाखतीत म्हटलं होतं की बॉलिवूड मला अफोर्ड करू शकत नागी. खरंतर हा मुद्दा त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता.