South Movie's Teaser was Launched in Graveyard : सगळ्यांनीच असे चित्रपट पाहिले असतील जे पाहून तुम्हाला भीती वाटू लागते. त्यात जर हॉरर चित्रपट पाहायचे असतील तर लोक हॉलिवूड चित्रपटांना पसंती देतात. त्यांचं म्हणणं असतं की हे चित्रपट जास्त भीती निर्माण करतात आणि तेव्हाच खरी मज्जा येते. पण काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतही असे अनेक चित्रपट आलेत. जे पाहून लोक खूप घाबरतात. असाच एक चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आहे. ज्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला खूप घाबरवतील. 'गीतांजली मल्ली वचिंडी' असं त्याचं नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन महिने झाले आहेत आणि तो ओटीटीवर देखील प्रदर्शित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गीतांजली मल्ली वचिंडी' या चित्रपटात एका चित्रपटाच्या क्रूची पटकथा दाखवण्यात आली आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते भूत असलेल्या महालात जातात. त्यांना तिथे गेल्यावर लगेच जाणीव होते की त्या महालात अनेक रहस्य आहेत. ज्यात अलौकिक शक्ती काम करत आहेत. त्यांच्या चित्रपटाच्या कथेला पुढे नेणाऱ्या भयानक घटना ते उलगडतात. संपूर्ण ग्रुपला ते धोक्यात असल्याचे जाणवते आणि ते स्वतःला या परिस्थितीतून कसे बाहेर काढतात हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 


या चित्रपटाविषयी आज आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. या चित्रपटाचं बजेट हे 4 कोटींचं होतं. तर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 10 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे शिवा तुरलापतिनं केलं होतं. चित्रपटाविषयी मजेशीर गोष्ट ही आहे की या चित्रपटाचा टिझर हा स्मशान भूमित प्रदर्शित करण्यात आला होता. तर अनेक लोक घाबरून पळून गेले आणि काही तर रात्रत्रर झोपलेच नाही. या सगळ्यामुळए हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. 


हेही वाचा : निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत


दिग्दर्शक शिवा तुरलापतीच्या या चित्रपटात अंजली, राहुल माधव, श्रीनिवास रेड्डी, सत्यम राजेश, सुनील, शकालाका शंकर आणि अली सारखे कलाकार दिसले. सीक्वलच्या पहिल्या भागात अंजली आणि श्रीनिवास रेड्डी दिसले होते. त्यांना या दुसऱ्या भागासाठी परत एकत्र आणण्यात आलं. त्याशिवाय अंजली सेन ही 'गॅंग्स ऑफ गोदावरी' मध्ये दिसली होती. तर आता हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.