निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत

Dalljiet Kaur : दलजीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाच केला प्रश्न... पती निखिलच्या वक्तव्यावर म्हणाली...

दिक्षा पाटील | Updated: May 27, 2024, 10:53 AM IST
निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत
(Photo Credit : Social Media)

Dalljiet Kaur : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पती निखिल पटेलवर आरोप करताना दिसते. आता दलजीतनं आरोप केला आहे की निखिलनं त्यांच्या लग्नाला मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर तिला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर तिनं या प्रकरणात मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. 

दलजीत कौरनं जेव्हा दुसरं लग्न केलं तेव्हा ती पती निखिल पटेलसोबत छोट्या पडद्याला रामराम करत केन्याला गेली. गेल्या अनेक महिन्यांपासून अफवा सुरु होती की दलजीत आणि निखिलमध्ये काही ठीक नाही. तर आज दलजीतनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की निखिल त्यांच्या लग्नाला मान्य करत नाहीये. 

Dalljiet Kaur Accusing Nikhil Patel Says He Is Refusing To Accept Our Marriage on social media

दलजीत कौरनं ज्या पोस्टला डिलीट केलं त्यात तिनं म्हटलं होतं की 'माझे कपडे, माझा चूडा, माझं मंदिर, माझं प्रत्येक सामान हे अजून तिथेच आहे, माझं घर तेच आहे. माझ्या मुलाचे कपडे, पुस्तक आणि आशा त्याच्या वडिलांकडून आहेत. माझं सासर आणि माझ्या हातानं बनवलेल्या सगळे फोटो त्या भिंतींवर आहेत. प्रत्येक भिंतीवर माझी साडी आहे आणि पती म्हणतायत की ते माझं घर नाही, म्हणतोय की लग्न कधी झालंच नाही. ते घर माझं आहे का?'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे दलजीत म्हणाली,'तुम्हाला यावर काय बोलायचं आहे. निखिल माझा नवरा नाही? तुमच्या हिशोबानं आमचं लग्न झालं नाही का?' दलजीत कौरनं केलेल्या या पोस्टनंतर तिचे चाहते सतत तिला पाठिंबा देत कमेंट करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'कृपया त्याच्या विरोधात कठोर कारवाई करा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ही फसवणूक आहे. तुझं निखिल पटेलसोबत लग्न झालं होतं. तो आता असं कसं बोलू शकतो.' अशा अनेक कमेंट करत नेटकरी दलजीतला पाठिंबा देत आहेत. 

हेही वाचा : 'भारताला अभिमान आहे की...', मोदींनी पोस्ट केला 'त्या' चौघींचा फोटो; छाया कदम यांचाही समावेश

दरजीतनं 2023 मध्ये निखिलसोबत लग्न केलं. तिनं आधी छोट्या पडद्यावरील अभिनेता शालीन भनोटशी लग्न केलं होतं. तर 2015 मध्ये दलजीत आणि शालीनचा घटस्फोट झाला. दरम्यान, दलजीत अखेर छोट्या पडद्यावरील 'ससुराल गेंदा फूल-2' या मालिकेत दिसली होती. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x