मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे आता पुन्हा एकदा अभिनेत्री चर्चेत आली आहे. मात्र ही चर्चा तिच्या पर्सनल लाईफशी निगडीत नसून तिच्या प्रोफेशल लाईफशी आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर नेहमीच ती काही ना काही चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने सोशल मीडियावर काही शेअर करताच लगेच ती चर्चेत येते. आता पुन्हा एकदा प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळी. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतेय. याचबरोबर तिचा 'प्राजक्तराज' नावाचा  दागिन्यांचा ब्रँडदेखील आहे.  नुकतंच अभिनेत्रीने कर्जतमध्ये फार्म हाऊस सुरु केलेय. या सगळ्या गोष्टींमुळे प्राजक्ता तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. 


सोशल मीडियावर प्राजक्ताने तिच्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर केली आहे. जे पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये प्राजक्ताने क‌प्शनमध्ये लिहीलं आहे की, Our next… हे तीन जण तर मजबूत अडकलेत! आणि आता तुम्हालाही अडकवायला येतायत! कोण? कधी? कुठे? कसे? कळेलच! #तीनअडकूनसीताराम २९ सप्टेंबर पासून फक्त चित्रपटगृहात!  तिच्या या पोस्टनंतर तिच्या आगामी सिनेमासाठी तिचे चाहते फारच उत्सुक असल्याचं दिसत आहे. 


हे पोस्टर पाहिल्या नंतर अनेक चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं की, चला कदाचित लंडन मधील शुट अखेर प्रेक्षकांसमोर येणार.  तर अजून एकाने म्हटलंय, वाह प्राजू तुझ्या आगामी मराठी चित्रपटाची वाट पाहत आहे लंडनमध्‍ये शुटिंग पूर्ण झाले आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो या चित्रपटात उत्‍तम यशाची आशा करतो आणि शुभेच्छा देतो. अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.



अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चं सुत्रसंचालन करताना दिसतेय. याचबरोबर  'रानबाजार' या वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांच्या लाडक्या प्राजूचा कोणताही सिनेमा प्रदर्शित झाला नव्हता. आता ही प्रतीक्षाही लवकरच संपणार असून प्राजक्ताने तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचे नाव, पोस्टर आणि सोशल मीडियावर करण्यात आलेली पोस्ट सारं काही हटके आहे.