प्रसिद्ध अभिनेत्री विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात झाली होती वेडी; लग्नासाठी निघाली होती लाच द्यायला
आज बॉलिवूड तसंच साऊथ सिनेसृष्टी गाजवणाऱ्या नयनतारा कोण ओळखत नाही. अभिनेत्री नयनताराचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.
मुंबई : आज बॉलिवूड तसंच साऊथ सिनेसृष्टी गाजवणाऱ्या नयनतारा कोण ओळखत नाही. अभिनेत्री नयनताराचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. साऊथची लेडी सुपरस्टार नयनताराने नुकताच तिचा 39 वा वाढदिवस साजरा केला आहे. शाहरुख खानसोबत 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये नयनताराने एन्ट्री घेतली.नयनतारा सोशल मीडियावर नेहमीच तिच्या प्रोफेशनसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. आज तुम्हाला आम्ही नयनताराच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार नयनतारा एका प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफरच्या प्रेमात वेडी झाली होती. असं म्हटलं जातं की, नयनतारा प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर प्रभू देवाच्या प्रेमात होती. एवढंच नव्हेतर प्रभूदेवाने तिच्यासोबत लग्नासाठी तिच्या पतीला सोडून देण्याचाही प्रयत्न केला होता. आज आम्ही तुम्हाला हा सगळा किस्सा आमच्या या रिपोर्टमधून सांगणार आहोत. एवढंच नव्हेतर या दोघांच्या रिलेशनशिपचा प्रभू देवाच्या वैवाहिक जीवनावर त्याचा वाईट परिणाम झाला. या रिलेशनशिपमुळे विवाहित डान्स कोरिओग्राफरच्या आयुष्यात अनेक वाद सुरु झाले.
कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर नयनताराने प्रभुदेवाच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. त्यावेळी सर्वत्र त्यांच्या प्रेमाची चर्चा होती. यानंतर यावर बराच गदारोळ सुरु झाला. या संपुर्ण प्रकरणावर प्रभू देवाच्या पत्नी आपलं मौन तोडलं आणि सांगितलं की, नयनताराने एकदा तिच्याकडे तिच्या पतीसोबत दुसरं लग्न करण्याची परवानगी मागितली होती. यानंतर प्रभू देवाच्या पत्नीने नयनतारावर बरेच गंभीर आरोपही लावले होते.
मीडिया रिपोर्टनुसार प्रभूदेवाला मिळवण्यासाठी नयनताराने सगळी हद्द पार केली होती. असंही म्हटलं जातं की, प्रभूसोबत लग्न करण्यासाठी नयनताराने त्याच्या पत्नीला आमिषही दाखवलं होतं. असंही म्हटलं जातं की, नयनताराने त्याच्या तत्नीला तीन करोड रुपये आणि ८५ लाखाचा नेकलेस गिफ्ट दिला होता. याचबरोबर काही सोन्याचे कॉईन दिले होते. जेणेकरुन त्याची पत्नी नयनतारा आणि प्रभू देवाच्या लग्नाला होकार देईल आणि त्याला सोडेल. मात्र या संपुर्ण प्रकरणावर नयनतारा आणि प्रभूदेवाने कधीच काही व्यक्त झाले नाही. मात्र काही दिवसांनी प्रभूदेवा आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला आणि यासाठी त्याला पत्नीला १० लाखांची पोटगी द्यावी लागली. मात्र एवढं सगळं झाल्यानंतरही प्रभूदेवा आणि नयनताराची लव्हस्टोरी पुर्ण होऊ शकली नाही.