मुंबई : छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री सायंतानी घोषला तुम्ही तर ओळखतंच असाल. सायंतनीला टीव्ही शो 'नागिन'मधून खूप प्रसिद्धी मिळाली. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सायंतनीला ओळख मिळण्याआधी ही अभिनेत्री बंगाली इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय होती. बंगाली इंडस्ट्रीमध्ये ती करिअर बनवण्यासाठी ती छोट्या पडद्यावर तिने पाऊल ठेवलं. तिचा पहिला शो 'कुमकुम' होता. यानंतर ती घर एक सपनामध्येही झळकली. नागिन (Naaginn) नंतर ती इंडस्ट्रीतील सुपरहिट एक्ट्रेस बनली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंतनी घोषने 'नागिन'मधून इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं. ती इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री बनली खरी, पण तिचे स्टारडम जास्तकाळ टिकलं नाही. 2009 मध्ये 'नागिन' शो संपल्यानंतर अभिनेत्री बेरोजगार झाली. तिला काम मिळालं नाही, पैसे संपले आणि घरही विकावं लागलं. अलीकडेच, अभिनेत्रीने सिद्धार्थ कन्नन यांच्याशी संवाद साधत तिच्या संघर्षाची कहाणी सांगितली.


सायंतनीनी वर्षभर बेरोजगार राहिली
यावेळी मुलाखतीत बोलताना सायंतानी घोष म्हणाली, ''निर्मात्यांनी मला काम दिलं नाही, कारण त्यांना असं वाटू लागलं की, आता मी नाग बनले आहे, त्यामुळे लोकांनी अशी प्रतिमा तयार केली आहे. त्यानंतर आलेल्या भूमिका मला आवडत नव्हत्या, कारण मी जिथे पोहोचले होते तिथून मी स्वतःला कसं कमी करू शकेन. मी दीड वर्ष घरी होते. त्यावेळी मी लहान होते, त्यामुळे पैसे कसे वाचवायचे हेही मला कळत नव्हतं. म्हणून पैसे आले आणि गेले."


'नागिन'मुळे काम मिळालं नाही.
सायंतानी घोषने सांगितले की, टीव्हीमधील यशस्वी कारकिर्दीत तिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी घर विकत घेतलं होतं. 'नागिन'नंतर ती चांगल्या कामाच्या शोधात होती, पण या शोमुळे तिला काम मिळत नव्हतं, कारण तिची इमेज 'नागिन' अशीच बनली होती. माझ्याकडे एक वर्ष काम नव्हतं. मला ऑफर्स येत होत्या, तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचलात की तुम्ही तडजोड करत नाही. दोन पैसे कमी घेईन, पण गुणवत्तेशी तडजोड करणार नाही, असंही त्यावेळी मला वाटले.''


सायंतानीला घर विकावं लागलं
यावेळी बोलताना सायंता पुढे म्हणाली की, ''एक दिवस माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. मी काय अजून केलं असतं, वडिलांकडे पैसे मागितले असते. पण मी कोणालाच विचारलं नाही याचा मला अभिमान होता. मी घर विकायचं ठरवलं. हृदयावर दगड ठेवून मी घर विकलं. ते माझं पहिलं घर असल्याने माझ्यासाठी ही मोठी गोष्ट होती. मला हे घर कायम माझ्याजवळ ठेवायचं होतं, पण हे होऊ शकले नाही. मी घर विकून भाड्याने राहू लागलो. इथून माझा संघर्ष सुरू झाला.