`तुम्हाला आवडेल किंवा आवडणारही नाही, पण हे जग फक्त पुरूषांचं आहे...`
नीना गुप्ता यांनी पुन्हा केलं पुरूषांना टार्गेट...
मुंबई : फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री आणि अभिनेत्यांता मिळत असलेलं मानधन कायम चर्चेचा विषय ठरतो. इडस्ट्रीमध्येचं नाही तर कोणत्याही क्षेत्रात या मुद्द्यावरून अनेक वाद होत असतात. पण आजपर्यंत मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही. आता अभिनेत्री नीना गुप्ता यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे. अनेक गोष्टी याठिकाणी त्यांनी मांडल्या. स्पॉटबॉयनुसार, पुरुष आणि महिला कलाकारांमधील वेतन असमानता हा केवळ एक भ्रम असल्याचं त्यांनी सांगितलं.
नीना म्हणाल्या, 'वेतनमधील असलेल्या अंतरावर विचारलेला प्रश्न मला आवडला. कोणत्याही प्रोफेशनमध्ये महिलांना पुरूषांपेक्षा अधिक वेतन मिळालं आहे? एक गृहिणी किती काम करते. तिला कधी वेतन मिळत नाही. तिला घरातील सामान आणण्यासाठी पैसे मिळतात. पण तिला स्वतःसाठी काही घ्यायचं असेल तर पतीला विचारावं लागतं.'
पुढे निना म्हणाल्या 'तुम्हाला आवडेल किंवा कदाचित आवडणारही नाही, पण हे जग पुरूषांचं आहे. घर असो किंवा ऑफिस पुरूष सगळीकडे काम करतात. पण एक महिला पुरूषांपेक्षा जास्त काम करते. महिलांचं काम कधी संपत नाही. विशेष म्हणजे स्वयंपाक बनवण्यापासून ते भाडं देण्यापर्यंत... तरीही लोक दुःखी असतात...'
'या विषयावर चर्चा करून काही फायदा नाही कारण प्रथम पुरूष असतात आणि त्यांच्यानंतर महिला...मला माहिती मी कोणत्या गोष्टींसाठी पात्र आहे.. मला काय मिळायला हवं. आयुष्य कधीचं कोणासाठी परफेक्ट नसतं. मला जे काही मिळालं आहे मी त्यापेक्षा जास्त मेहनत केली आहे.' असं नीना म्हणाल्या.