मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला  'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा बिगबजेट चित्रपट आज प्रदर्शित झालाय. ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यातील बऱ्याचजणांचा अपेक्षाभंग झालाय. समिक्षकांना देखील हा सिनेमा फारसा रुचलेला दिसत नाही. असं असताना देखील रिलीजच्या पहिल्या दिवशीच सिनेमाने 4 नवे रेकॉर्ड केले आहेत. या चित्रपटाचे पहिल्या दोन दिवसांचे शो हाऊसफुल झालेत. पहिल्या दिवशी हा चित्रपट ३५ ते ४० कोटींचा व्यवसाय करेल असा अंदाज वर्तवला जातोय तर चार दिवसांचा मोठा वीकेंड असल्यामुळे हा चित्रपट वीकेंडपर्यंत २०० कोटी कमावण्याची शक्यता आहे.


सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 वेगवेगळ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्टनुसार, या सिनेमाची 2 लाखाहून अधिक अॅडव्हान्स बुकींग झाली. यामुळे आमिर खानचा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' भारतातील आजपर्यंतच्या सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग झालेला सिनेमा ठरलाय.


सर्वात महागडे डिजीटल राईट्स 


 माध्यमात सुरू असलेल्या चर्चांनुसार या सिनेमाचे सॅटेलाईट आणि डिजीटल राईट्स रिलीज आधीच 150 कोटीहून अधिक किंमतीत विकले गेले आहेत. 


सर्वाधिक स्क्रिन्सवर रिलीज 


 240 कोटी बजेट असलेल्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' सिनेमा जगभरात 7 हजारहून अधिक स्क्रिन्सवर रिलीज केला गेला. याआधी बाहुबली सिनेमा 6 हजार 500 स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता. 


सर्वात महागडा हिंदी सिनेमा 


 240 कोटी बजेट असलेला हा यशराजचा सिनेमा भारतातील सर्वात महागडा हिंदी सिनेमा ठरलाय. याआधी पद्मावत 210 कोटींमध्ये बनला होता. 


चित्रपटाची जबरदस्त चर्चा


 हा चित्रपट भारतात तब्बल 7 हजारहून अधिक स्क्रिन्सवर प्रदर्शित झालाय तर परदेशात २ हजार स्क्रिन्सवर प्रदर्शित झालायं. २१० कोटी बजेट असलेला हा चित्रपट यशराज फिल्मसनं थ्रीडी आणि आयमॅक्समध्येही प्रदर्शित केलायं. दोन सुपरस्टार पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्यामुळे या चित्रपटाची जबरदस्त चर्चा आहे.