`ठग्स ऑफ हिंदुस्तान` सिनेमाचा अफलातून ट्रेलर
जबरदस्त ट्रेलर
मुंबई : प्रेक्षक ज्या सिनेमाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते तो लाँच झाला आहे. आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाचं ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमात कतरिना कैफ, फातिमा सना शेख, अमिताभ बच्चन आणि आमिर खान दिसणार आहे. हा एपिक अॅडवेंचर मल्टीस्टारर सिनेमा असून यशराज बॅनर खाली तयार करण्यात आला आहे.
ट्रेलर लाँचच्या अगोदर या सिनेमातील प्रत्येक कॅरेक्टरचे पोस्टर समोर आले. हा सिनेमा नक्की वेगळा असणार याची खात्री होती. सिनेमात कतरिना सुरैया बनली आहे. तर अमिताभ बच्चन 'खुदाबख्श'ची भूमिका साकारत आहेत. तर फातिमी 'जफीरा' हे कॅरेक्टर प्ले करत आहेत. आणि आमिर खान 'फिरंगी' हे कॅरेक्टर साकारत आहे. जेव्हा पोस्टर लाँच झालं तेव्हा आमीर खान गाढवावर बसून चाहत्यांच्या समोर आला.
या सिनेमाला विजय कृष्ण आचार्य यांनी दिग्दर्शित केलं आहे. सिनेमातील सर्वच पात्र खूप आकर्षक आणि वेगळी आहेत. आणि आज सिनेमाचा ट्रेलर लाँच झाल्यामुळे खूप उत्सुकता आहे. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान ' हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.