मुंबई : दिवाळीच्या सणाला यंदा 2018 मध्ये मोठा सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' रिलीज होत आहे. आमीर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख स्टारर या सिनेमात आहेत. ट्रेलरला पाहून चाहत्यांनी या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेड अॅनालिस्ट अक्षय राठी यांनी ठग्स ऑफ हिंदुस्तान या सिनेमाने केलेली पहिली कमाई सांगितली आहे. या सिनेमाने जवळपास 40 करोड रुपयांच कलेक्शन पहिल्याच दिवशी करू शकते. ठग्स ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा संजूच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला (34.75 करोड रुपये) मागे टाकणार आहे. यासोबतच हा सिनेमा यंदाचा सर्वात मोठा ओपनर सिनेमा ठरला आहे. 


हा सिनेमा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. बॉक्स ऑफिसवर दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन खूप महत्वाचं मानलं जातं. 2015 मध्ये  याच दिवशी रिलीज झालेल्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचं कलेक्शन 40 करोड रुपयांपेक्षा अधिक झालं होतं. 


ठग्स ऑफ हिंदुस्तान या दिवाळीत रिलीज होणारा सर्वात मोठा सिनेमा आहे. ट्रेड अॅनालिस्टच्या माहितीनुसार जवळपास 5500 स्क्रिनवर म्हणजे 4800 हिंदी, तामिळ - तेलुगु 600 स्क्रिनवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. मोठ्या विकेंडला सिनेमा प्रदर्शित होणार असून 130 ते 140 करोड रुपये कलेक्शन करेल अशी आशा आहे.