`पद्मावत`नं उत्सुकता ताणली, एका तिकीटाचा दर माहीत आहे का?
करणी सेनेच्या माध्यमातून देशभरात सुरू असवल हिंसक विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त सिनेमा `पद्मावत` अखेर प्रदर्शित होतोय.
मुंबई : करणी सेनेच्या माध्यमातून देशभरात सुरू असवल हिंसक विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त सिनेमा 'पद्मावत' अखेर प्रदर्शित होतोय.
सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता असल्यानं तिकिट दरही गगनाला भिडले आहेत. दिल्ली आणि मुंबईत एका तिकीटासाठी तब्बल २००० रुपये मोजावे लागत आहेत.
वर्षभरापासून सातत्याने हा सिनेमा चर्चेत असल्यामुळे सिनेमाची तब्बल ९० टक्के तिकीटं अॅडव्हान्स बुकींगमध्येच खपली आहेत.
तब्बल ८००० स्क्रिन्सवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय. बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांमध्ये २०० कोटींचा पल्ला हा सिनेमा गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
सिनेमाला समीक्षकांनीही पसंतीची पावती दिली असून सिनेमातील रणवीर सिंहच्या कामाचं कौतुक होतंय.
गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या हिसंक आंदोलनानंतर मुंबईसह महाराष्ट्रातल्या बहुतांश चित्रपटगृहांना छावणीचं रुप आलंय.
सिनेमाला करणीसेनेचा विरोध कायम असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून थिएटरबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.