Kissing Scene तोसुद्धा इतका कठीण, की टॉपच्या अभिनेत्याला द्यावे लागले 80 टेक
हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : तुम्ही कितीही अनुभवी कलाकार असलात तरी प्रत्येक वेळी कॅमेरासमोर गेल्यावर एक नवीन अनुभव असतो. हेच कारण आहे की ऑस्कर-विजेते जॉर्ज क्लूनी आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांनी, त्यांच्या पुढच्या 'Ticket to Paradise' चित्रपटासाठी किसींग सीन शूट करताना, फक्त एका किससाठी 80 टेक दिले. याचा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे.
जॉर्ज क्लूनी आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांचा हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे, तर हे दोघं सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण ऑस्ट्रेलियात झाले असून जगभरातील लोकप्रिय कलाकारांमध्ये असलेले हे कलाकार सहा वर्षांनंतर एकत्र पडद्यावर परतणार आहेत.
आणखी वाचा : कोण होणार कतरिनाची वहिनी? Koffee With Karan 7 मध्ये नाव समोर
'Ticket to Paradise' ही एका अमेरिकन जोडप्याची कहाणी आहे, ज्यांचा 14 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यांना एक मुलगी असून ती मोठी झाली आहे. त्यांना कळतंय की त्यांच्या मुलीला बालीमध्ये एका मुलीला भेटली आहे. तर ते दोघं प्रेमात आहेत. त्या दोघांना मुलीला लग्नापासून रोखायचं आहे. आई-वडिलांनी जी चूक केली ती आपल्या मुलीनं करू नये, अशी दोघांची इच्छा आहे. यानंतर, मुलीला लग्नापासून रोखण्यासाठी ते कोणत्या शक्कल लढवतात हे यारोमँटिक कॉमेडीमध्ये दाखवण्यात आले आहे.
आणखी वाचा : Pushpa 2 चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री!
जॉर्ज क्लूनी आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांनी 'ओशन इलेव्हन' आणि 'मनी मॉन्स्टर' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघेही खूप चांगले मित्र आहेत. 61 वर्षीय जॉर्ज क्लूनी यांना दोन ऑस्कर मिळाले आहेत आणि 54 वर्षीय ज्युलिया रॉबर्ट्सनं ऑस्कर जिंकला आहे. 'Ticket to Paradise' च्या शूटिंगबद्दल बोलताना जॉर्ज क्लूनीनं मीडियाला सांगितले की, 'आम्ही या किसिंग सीनबद्दल आश्चर्यचकित झालो होतो आणि खूप हसलो होतो की मित्रांमध्ये असे दृश्य पडद्यावर कसे दिसेल.' (ticket to paradise actor george clooney and julia roberts kiss scene in the film took 80 takes)
आणखी वाचा : 'त्यांची कहाणी आता...', लेकिच्या तुटलेल्या लग्नावर पहिल्यांदाच बोलले Samantha चे वडील
जॉर्ज क्लूनी पुढे म्हणाले, '79 व्या टेकपर्यंत, आम्ही फक्त हसत होतो आणि सीरिअस होऊ शकलो नाही. पण त्यानंतर आम्ही हे काम सीरीअसली घेतलं आणि एकाच टेकमध्ये तो किसिंग सीन केला. आम्ही खूप चांगले मित्र आहोत हे लोकांना माहीत आहे. एवढंच काय तर आमचं स्वतःचं कुटुंब असताना, आम्ही घटस्फोटित आहोत असे अर्ध्या अमेरिकेला वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.'