Tiger 3 Advance Booking : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच 'टाइगर 3'  या चित्रपटात दिसणार आहे. याच महिन्यात दिवाळीच्या निमित्तानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून टायगर आणि जोया हे दोघे ही अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. आज म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी चित्रपटाच्या आगाऊ बूकिंगला सुरुवात झाली आहे. आगाऊ बूकिंग सुरु होताच चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिजिटल बुकिंग वेबसाइट 'बूक माय शो'वर 'टाइगर 3' पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. आज या चित्रपटाच्या बूकिंगला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सैकनिल्कच्या रिपोर्टसनुरा, चित्रपटानं 2डी वर्जन्स, आयमॅक्स 2डी आणि 4डी व्हर्जन्स मध्ये चांगलं कलेक्शन केलं आहे. यानुसार, 'टाइगर 3' ला पहिल्या दिवशी खूप चांगली ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे. या दिवाळीला थिएटरमध्ये सलमानचा 'टाइगर 3' ची धूम पाहायला मिळणार आहे. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, आगाऊ बूकिंगमध्ये पहिल्या दिवशी हा चित्रपट एक कोटी पेक्षा जास्त कलेक्शन करणार आहे. हिंदी व्हर्जनमध्ये या चित्रपटाची 3292 तिकिट्स विकण्यात आली आहे. दरम्यान, चित्रपटाची 89 लाख पेक्षा जास्त कमाई ही हिंदी भाषेत होणार आहे. तर दुसरीकडे आयमॅक्स 2डी मध्ये 831 तिकिटं आणि 4डी व्हर्जनची 67 तिकिटं विकली आहेत. आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, चित्रपट आयमॅक्स 2डी मध्ये 55 लाख आणि 4डी एक्समध्ये 43, 430 रुपयांपर्यंत कमाई होईल. 



'टाइगर 3' ची कमाई ही फक्त मल्टीप्लेक्समधून नाही तर सिंगल स्क्रीन्समधून देखील होणार आहे. पिंकव्हिलानं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, डिलायट सिंगल स्क्रीनमधअये पहिल्या तीन दिवसात 2800 'टाइगर 3' ची इतकी तिकिट विकण्यात आली आहे. इतकंच नाही तर, सोशल मीडियानुसार, चित्रपटाला दाक्षिणात्य भागात या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. 



हेही वाचा : वयाच्या 47 व्या वर्षी 10 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रणदीप हुड्डा गुपचूप करणार लग्न


दरम्यान, शाहरुख खानच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर 'टायगर 3' या चित्रपटाची आगाऊ बूकिंग ही पठाण आणि जवानच्या तुलनेत कमी आहे. 'पठाण' ने 117 हजार नॅशन्ल चेन्सवर आणि 'जवान' नं 254 हजार तिकिटं ही 'बूक माय शो' वर बूकिंग केली होती. आता सलमान खानचा चित्रपट शाहरुखच्या या दोन्ही चित्रपटांना मागे टाकणार की नाही.