अभिनेता टायगर श्रॉफच्या जवळच्या व्यक्तीचं निधन
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करतो. अलीकडेच, त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, त्याने त्याची फिटनेस ट्रेनर कयजाद कपाडियाचं बुधवारी दुपारी निधन झाल्याची माहिती दिली आहे. टायगर श्रॉफने त्याच्या सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
टायगर श्रॉफने शेअर केली पोस्ट
टायगर श्रॉफचा फिटनेस ट्रेनर कैयजादने बुधवारी या जगाचा निरोप घेतला. कैजादच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अलीकडेच टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याचा फिटनेस ट्रेनर कैजादचा फोटो शेअर करत त्याने लिहिलंय की, "कैजाद सर विश्रांती घ्या." यासोबत, त्याने हार्ट ईमोजी आणि शुभेच्छा इमोजी देखील शेअर केल्या आहेत.
कैजाद मुंबईत फिटनेस अकादमी चालवायचा
फिटनेस ट्रेनर कैजाद मुंबईत त्याची एक फिटनेस अकादमी चालवायचा. तो बॉलिवूडमधील बड्या स्टार्ससाठी वर्कआउट, व्यायाम आणि डाईटप्लान तयार करत असे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, एक सेलिब्रिटी ट्रेनर असल्याने त्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. कैजादच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण फिटनेस इंडस्ट्री हादरली आहे. त्याच्या मृत्यूचं कारण कोणालाही माहित नाही. मात्र त्याचे मित्र पुण्याला रवाना झाले आहेत. जिथे त्याचे अंतिम संस्कार होणार आहेत.