वॉन्टेडच्या सीक्वलमध्ये सलमानऐवजी असणार `हा` अभिनेता
सलमान खानचा होकार मिळण्यास खूप वेळ जात असल्याने....
मुंबई : फिल्म निर्माते बोनी कपूर २००९ मध्ये आलेल्या त्यांच्या वॉन्टेड सिनेमाचा सीक्वल बनवू इच्छित आहेत. मात्र सलमान खानचा होकार मिळण्यास खूप वेळ जात आहे. त्यामुळे त्यांनी आता सलमानची वाट न बघण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून वॉन्टेडचा सीक्वल चर्चेत आहे. पण तो सत्यात येण्याचा योग काही केल्या येत नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान मुद्दामून बोनी कपूर यांना वाट पाहायला लावत असल्याचे बोलले जात आहे. याचे कारण म्हणजे बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर. सलमान आणि अर्जुनमध्ये असलेला वाद अगदी जगजाहीर आहे.
या अभिनेत्याच्या नावाची चर्चा
रेस ३ सिनेमच्या प्रमोशनदरम्यान सलमान आपल्या आगामी सिनेमांची नावे सांगितली. मात्र त्यात वॉन्टेड-2 चे नाव नव्हते. त्यामुळे वॉन्टेड-2 साठी बोनी कपूर यांनी नव्या अभिनेत्याचा शोध सुरु केला आहे. यात टायगर श्रॉफचे नाव समोर येत आहे.
वॉन्टेड एक अॅक्शन सिनेमा होता आणि टायगर सध्याचा सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे. अलिकडेच खुद्द सलमानने त्याचे कौतुक केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोनी कपूर यांनी दिग्दर्शक प्रभुदेवासोबत केलेल्या चर्चेतून वॉन्टेडच्या सीक्वलसाठी टायगर श्रॉफला कास्ट करण्याची चर्चा सुरु आहे. त्यानंतर टायगरनेही बोनी आणि त्यांच्या टीमसोबत याबद्दल चर्चा केल्याचे समजतयं.
२०१९ मध्ये सुरु होणार शुटींग?
सुत्रांनुसार, बोनी कपूर यांच्याकडे वॉन्टेड २ साठी जबरदस्त कथा असून टायगरनेही स्क्रिप्ट वाचण्यासाठी होकार दिला आहे. पण २०१९ मध्येच टायगर वॉन्टेड २ साठी वेळ देऊ शकेल. तर सध्या प्रभुदेवाही सलमानच्या दबंग ३ च्या प्री प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे.