मुंबई : नृत्य आणि थरारक दृष्टांमधून दिसणाऱ्या कौशल्याच्या बळावर अभिनेता टायगर श्रॉफ यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. फिटनेसच्या बाबतीत कायमच सजग असणारा आणि अनेकांनाच स्टाईल गोल्स देणाऱ्या या अभिनेत्याचं त्याच्या बहिणीशी तसं खास नातं. सोशल मीडियावर टायगरची बहीण, कृष्णा हिसुद्धा बऱ्यापैकी सक्रिय असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णानं कायमच तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी या माध्यमातून सर्वांपुढं ठेवल्या. आताही, जेव्हा तिच्या जीवनात एक अनपेक्षित वळण आलेलं असतानाही तिनं एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. कृष्णाची ही पोस्ट अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. कारण यातून तिनं प्रियकर एबन हायम्स याच्याशी आपलं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं आहे. 


कृष्णानं एबनसोबतचे फोटोही डिलीट केले आहेत. शिवाय त्याच्यासोबतच्या कोणत्याही पोस्टमध्ये आपल्याला टॅग करु नये असं आवाहन तिनं केलं. 


'तुम्ही सर्व फॅन क्लब चांगले आहात वगैरे, सर्वकाही ठीक. पण, एबनसोबतच्या एडिट्समध्ये मला टॅग करणं थांबवा. आम्ही एकत्र नाही आहोत. त्यामुळं आमचं नाव एकत्र जोडणं थांबवा. तुम्हा सर्वांना हे सांगतेय कारण हे बऱ्यापैकी सर्वज्ञात होतं', अशी पोस्ट नाईलाजानं लिहित कृष्णानं एक प्रकारे सर्वांना आवाहनच केलं. 



 


कृष्णा आणि एबन हायम्स एकमेकांना वर्षभरापासून डेट करत होते. या वर्षाच्या सुरूवातीला दोघांनी डेटिंग अॅनिव्हसरीही साजरा केली. त्यांच्या नात्याची विण अधिक घट्ट होत आहे असं वाटत असतानाच कृष्णानं ब्रेकअपची माहिती दिल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.