मुंबई : दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर, टायगर श्रॉफने पॉप-कल्चर आउटफिट, बिग बैंग म्यूजिक सोबत आपले पहिले वहिले गाणे 'अनबिलिवेबल' प्रदर्शित केले आहे. या बहु-प्रतिभाशाली स्टारने याचा एक म्यूजिक व्हिडिओ देखील प्रदर्शित केले असून त्याचे दिग्दर्शन त्याचा जूना सहकारी  असलेल्या पुनीत मल्होत्रा द्वारे करण्यात आले आहे. या  व्हिडिओच्या मदतीने टायगर आपल्या चाहत्यांना ऑडियो-व्हिज्युअलचा एक शानदार अनुभव देऊ इच्छित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायगरने आपल्या सोशल मीडिया हैंडलवर हे गाणे प्रदर्शित केले असून त्यावर लिहिले आहे, "And just when I thought jumping off one building to another was tough...for me this has been the most challenging yet full-filling experience. Highest respect to musicians all across the globe, so much to learn ... but until then here's presenting our humble effort #YouAreUnbelievable out now!”



या लॉकडाउनमध्ये नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या प्रत्येकाप्रमाणेच,टायगरने देखील या वेळेचा उपयोग स्टूडियोमध्ये आपल्या आवाजावर कठोर मेहनत करून आणि या म्यूजिक वीडियोचे शूटिंग करत घालवला आहे. गाणे आणि संगीताविषयी आपल्या विचारांबाबत बोलताना,टायगर म्हणतो की, “मला नेहमीच स्वत:च्या चालीवर गायचे आणि नाचायचे होते आणि शेवटी मला ते करायची संधी मिळाली. मी या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी खूप उत्साहित आहे- शिकण्यासाठी आणि नवे शोधण्यासाठी खूप काही आहे."


टायगर याचे उदाहरण आहे कि तुम्ही आपल्या जीवनाच्या अविश्वसनीय गोष्टींना कसे प्राप्त करु शकता, जो पर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी कठोर मेहनत करता. या महामारीच्या कठीण दिवसात आपल्या चाहत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी,टायगरने सर्व प्लेटफॉर्मवर #YouAreUnbelievable चैलेंज ची सुरुवात केली आहे. ज्यावर त्यांचे अनेक चाहते जगाला आपले टैलेंट दाखवू शकतील. 



बिग बैंग म्यूज़िकच्या यूट्यूब चैनल आणि सर्व टेलीविज़न प्लेटफ़ॉर्मवर हा म्यूजिक वीडियो पाहता येऊ शकतो. तसेच, सर्व स्ट्रीमिंग ऐप्स आणि रेडियो स्टेशनवर या ट्रैकचा आनंद घेता येऊ शकेल!