मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस, अॅक्शन आणि डान्समुळे तरुणांना चांगलाच भावतो. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेला टायगर सातत्याने त्याचे नवनवे फोटोज शेअर करत असतो. त्याने फोटो शेअर करताच त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता टायगरने त्याचा एक नवा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत टायगरने लिहिले की, नाही ही योगा पोज नाही पण रिलॉक्सिंग पोज आहे आणि ती असायलाच हवी.



या फोटोला सुमारे 6,83,000 हजारहुन अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोत टायगरचा बोल्ड, सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, तू हॉलिवूडसाठी ट्राय करायला हवेस.



सध्या टायगर श्रॉफ स्टूडेंट ऑफ द ईअर २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्या सोबत अनन्या पांडे आणि तारा सुतारीया आहे.