मुंबई : अनेक मुलींच्या गळ्यातील ताईद असलेला अभिनेता टायगर श्रॉफच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याचं अभिनय, डान्स, स्टंट, अॅक्शनमुळे त्याने कलाविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याची बहिण कृष्णा श्रॉफ कलाविश्वात सक्रीय नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या बाकी अभिनेत्रींप्रमाणे आहे. सोशल मीडियावरील तिचे बोल्ड फोटो कायम व्हायरल होत असतात. कृष्णा सध्या तिच्या खाजगी जीवनामुळे सतत चर्चेत असते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्र किनारी ती बॉयफ्रेंड एबन हायम्स फिरत असल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये ती बिकनीमध्ये दिसत आहे. दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. कृष्णा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती सतत दोघांचे फोटो स्वत: इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. 


काही दिवसांपूर्वी टायगर-कृष्णाने फोटोशूट केले होते. कृष्णा अभिनेत्री नसली तरी ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी ग्लॅमरस देखील नाही. ती देखील टायगर प्रमाणे फिटनेस बद्दल जागृत आहे. तिच्या प्रत्येक घडामोडींकडे तिच्या चाहत्यांचे विशेष लक्ष असते.