मुंबई : सलमान खानचा 'टायगर जिंदा है' चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटातून सलमान आणि कतरिना पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसत आहेत. 'टायगर जिंदा है'चं दिग्दर्शन अब्बास जफर यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानच्या 'ट्यूबलाईट' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर 'टायगर जिंदा है'नं मात्र बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.


दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारी या चित्रपटानं एकूण १४.९२ कोटींची कमाई केली आहे. तसंच आत्तापर्यंत दोन आठवड्यांमध्ये चित्रपटानं २३२.५२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.


'टायगर जिंदा है' हा चित्रपट २०१२ साली आलेल्या 'एक था टायगर' चित्रपटाचा सिक्वल आहे. 'टायगर जिंदा है'मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफनी अॅक्शन सीन्स केले आहेत. या चित्रपटाचं शूटिंग ग्रीस, मोरक्को यासारख्या सुंदर ठिकाणी करण्यात आलं आहे.